Beed News: परळीत 'शासन आपल्या दारी' हा कार्यक्रम मंगळवारी पार पडला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान जवळपास दीड हजार कोटींच्या कामांचा शुभारंभ करण्यात आला. याचवेळी कृषीमंत्री धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे एकाच मंचावर पाहायला मिळाले.
यासंदर्भातच बोलताना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंडे बंधू-भगिनी यांना एक मोलाचा सल्ला दिला. "तुम्ही असेच एकत्रीत राहा, आम्ही तिघे तुमच्या पाठीशी अशी ताकद उभी करू की, बीडचे आणि परळीचे कल्याण होईल ", असे सूचक विधान त्यांनी केले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
राज्यातील सत्तांतरानंतर बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी अजित पवारांची साथ देत युती सरकारला पाठिंबा दिला. यामध्ये त्यांना कृषीमंत्रिपद मिळालं. त्यामुळे आता राष्ट्रवादी (अजित पवार), शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप अशा तीन पक्षांचे सरकार सत्तेत आहे. पण आगामी निवडणुकीत परळीतून धनंजय मुंडे की पंकजा मुंडे यांच्यापैकी कोण उमेदवार असेल, हा प्रश्न अनेकांना पडलेला आहे.
अशातच परळीतील 'शासन आपल्या दारी' या कार्यक्रमात धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे एकाच मंचावर पाहायला मिळाले. याच कार्यक्रमात बोलताना फडणवीसांनी दोघांनाही मोलाचा सल्ला दिला. ते म्हणाले, "तुम्ही असेच एकत्रीत राहा, आम्ही तिघे (मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार) तुमच्या पाठीशी खंबीर अशी ताकद उभी करू की, बीडचे आणि परळीचे कल्याण होईल. तुम्ही जर असेच एकत्र राहिलात तर बीड-परळीसह महाराष्ट्राचेही कल्याण होईल. हा मंच असाच आम्हाला दिसत राहिल", असे फडणवीस म्हणाले.
दरम्यान, येत्या काळात फडणवीसांचा हा सल्ला धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि पंकजा मुंडे (Pankaja Munde) ऐकणार का ? हे पाहावं लागणार आहे.
"आम्ही तिघं एकत्र आलो आहोत, आम्ही महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्याचे काम करत आहोत, पण काही लोकांना ते पाहवत नाही, काल-परवा चार राज्याच्या निवडणुका (Elections) झाल्या, त्या निवडणुकांमध्ये मुख्यमंत्र्यांना प्रचाराला बोलावलं. आम्ही प्रचाराला गेलो, आम्ही ज्या ठिकाणी प्रचार केला तेथेही विजय मिळाला. पण काही लोकांच्या पोटात दुखलं".
"ते म्हणतात की, तुम्ही दुसऱ्या राज्यात का गेले ? पण तुम्हाला बाजुच्या घरात देखील कोणी बोलवत नाही. आम्हाला तर दुसऱ्या राज्यात बोलवतात. आता दुसऱ्या वेळेस तर अजित पवारांनाही (Ajit Pawar) प्रचाराला घेऊन जाणार आहोत, म्हणजे दोन चार जागा अजून वाढतील", असे म्हणत त्यांनी विरोधकांना टोला लगावला.
(Edited by- Ganesh Thombare)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.