Dattatrya Bharne News : एका गुंठ्याचाही पंचनामा शिल्लक राहणार नाही, दिवाळीआधीच मदतही देऊ ! कृषीमंत्री दत्ता भरणे यांचा शब्द

Maharashtra Agriculture Minister: जिल्हाधिकाऱ्यांनी वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्याने आमच्या नुकसानीचे पंचनामे होत नाही, तर आम्हाला मदत कशी मिळेल?
Agriculture  Minister Dattatrya Bharne Visit Badnapur News
Agriculture Minister Dattatrya Bharne Visit Badnapur NewsSarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. कृषीमंत्र्यांनी जाहीर केले की प्रत्येक गुंठ्याचा पंचनामा करून आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांची मदत केली जाईल.

  2. शेतकऱ्यांना मदत थेट दिवाळीपूर्वी खात्यात जमा केली जाईल असा शब्द दिला आहे.

  3. सरकारने तत्काळ पिकांच्या नुकसानीचे सर्वेक्षण सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.

Flood Affected Farmers : मराठवाड्याच्या अनेक जिल्ह्यात पुर व अतिवृष्टीने शेती, शेतमालाचे प्रचंड नुकसान झाले आहे. घरं, जनावरे, शेती खरवडून गेल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत प्रशासनाकडून मात्र पंचनामे करण्यात दिरंगाई केल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे. या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी एक गुंठ्याचाही पंचनामा शिल्लक राहणार नाही, दिवाळीपूर्वीच आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना मदतही देऊ, असा शब्द त्यांनी दिला.

बदनापूर तालुक्यातील गोकुळवाडी शिवारात कृषीमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharne) यांनी अतिवृष्टीच्या नुकसानीची पाहणी केली. आमदार नारायण कुचे, माजी आमदार अरविंद चव्हाण हे यावेळी त्यांच्यासोबत उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांनी भरणे यांच्याकडे सरसकट पंचनामे करण्याची मागणी केली. नुकसानीचे पंचनामे होत नसल्याची ओरडीही शेतकऱ्यांनी त्यांच्यासमोर केली. जिल्हाधिकाऱ्यांच्या पंचनाम्याच्या भूमिकेबाबत कृषीमंत्र्यांकडे नाराजी व्यक्त केली.

बदनापूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे खरीप पिकांसह फळबागांची दाणादाण उडाली आहे, मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्याने आमच्या नुकसानीचे पंचनामे होत नाही, तर आम्हाला मदत कशी मिळेल? असा संतप्त सवाल बदनापूर तालुक्यातील गोकुळवाडी आणि बाजार गेवराई शिवारातील शेतकऱ्यांनी (Farmers) थेट कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे केला. यावेळी शेतकऱ्यांनी अतिवृष्टीच्या पंचनाम्यात दूजाभाव होत असल्याची ओरड केली. तेव्हा भरणे यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमणध्वनीवरून बदनापूर तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्यांच्या एकेका गुंठ्याचा सरसकट पंचनामा करावा, असे आदेश दिले.

Agriculture  Minister Dattatrya Bharne Visit Badnapur News
Ajitdada on Dattatray Bharne : अजितदादांचा कृषिमंत्री भरणेंना भरसभेत इशारा; ‘आता तुझ्या साक्षीनं सांगितलंय, तुझं काही निघू देऊ नको’

बाजार गेवराई शिवारातील ओंकार ढाकणे यांच्या अतिवृष्टीत बाधित झालेल्या कापूस आणि गोकुळवाडी शिवारातील दादाराव भडांगे यांच्या सोयाबीन पिकाची पाहणी त्यांनी केली. शेतकऱ्यांनी खरीप पिकांसह फळबागा उध्वस्त झाल्याचे सांगितले. तसेच आमच्या जमिनी देखील खरवडून गेल्या आहेत. पशुधन दगावले, शेडनेटचे देखील नुकसान झाल्याची व्यथा मांडली.

Agriculture  Minister Dattatrya Bharne Visit Badnapur News
Maharashtra Government : अतिवृष्टी 2025 मध्ये अन् आर्थिक मदत 2 वर्ष जुन्या निर्णयानुसार : फडणवीस सरकारच्या नुकसान भरपाईवर शेतकरी नाराज

दत्तात्रय भरणे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना एकट्या जालना जिल्ह्यात अतिवृष्टीने 2 लाख 54 हजार हेक्टर म्हणजे 6 लाख 35 हजार एकरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे सांगितले. राज्यात 80 लाख एकरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. कुणाच्या घरात पाणी शिरले, कुणाच्या घराची पडझड झाली, काही ठिकाणी जमिनी वाहून गेल्या, काही ठिकाणी पशुधन वाहून गेले अशा सर्व नुकसानीची जाणीव सरकारला आहे. त्यामुळे एका ठिकाणी पाहणी केली म्हणजे मला ईतर ठिकाणी झालेल्या नुकसानीचा अंदाज आला आहे.

महसूल, कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना माझ्या कडक सूचना आहेत की, जालना जिल्ह्यामध्ये कुठल्याही शेतकऱ्याचा पंचनामा शिल्लक राहिला नाही पाहिजे. जालना जिल्ह्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीने नुकसान झाले. त्याचे सरसकट पंचनामे झाल्यावर अहवाल प्राप्त होताच दहा दिवसात शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावर मदत पोचवली जाईल. आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि सर्वच मंत्री अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांची वेदना जाणून घेत आहेत. त्यामुळे सरकार आपल्यासोबत आहे, शेतकऱ्यांना निश्चित मदत दिली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

FAQs

प्र.१: पंचनामा कधी होणार?
उ.१: कृषीमंत्र्यांच्या आदेशानुसार पंचनामा तातडीने सुरू करण्यात येणार आहे.

प्र.२: शेतकऱ्यांना मदत कधी मिळेल?
उ.२: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा केली जाईल.

प्र.३: पंचनामा कोणत्या पिकांसाठी होईल?
उ.३: सर्व नुकसानग्रस्त पिकांचा गुंठा-गुंठ्याने पंचनामा केला जाईल.

प्र.४: मदत कोणत्या माध्यमातून मिळेल?
उ.४: मदत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल.

प्र.५: ही मदत महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना लागू आहे का?
उ.५: ही मदत फक्त आपत्तीग्रस्त व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी लागू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com