Jalna Portest News : अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरूच ; संभाजीराजे, रोहित पवार, खासदार जाधवांनी घेतली आंदोलनकर्त्यांची भेट..

Marathwada News : सकाळी छत्रपती संभाजीराजे यांनी उपोषण स्थळी भेट देऊन आंदोलकांशी चर्चा केली.
Maratha Reservation Protest News
Maratha Reservation Protest NewsSarkarnama
Published on
Updated on

Maratha Reservation : अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी शनिवार (ता.दोन) उपोषण सुरू आहे. राज्य शासनाने (Maratha Reservation News) आरक्षण जाहीर केल्याशिवाय उपोषण मागे न घेण्याचा निर्धार मुख्य उपोषणकर्ते मनोज जरांगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केला आहे. शनिवारी विविध राजकीय नेते भेट देणार आहेत.

Maratha Reservation Protest News
Jalna Maratha Protest : मग हीच ती दंगल होती का ? नितेश राणेंचा ठाकरे, राऊतांवर गंभीर आरोप

दरम्यान संभाजीराजे छत्रपती यांनी शनिवारी भेट देऊन आंदोलकांशी चर्चा केली. (Jalna) अंतरवाली सराटी येथे शुक्रवारी पोलिस आणि ग्रामस्थांमध्ये मोठा वाद झाला. या वादात पोलिसांकडून लाठीचार्ज अश्रूधुराच्या नळकांड्याचा मारा करण्यात आला. (Chhatrapati Sambhajiraje) संतप्त जमावाने पोलिसांवर दगडफेक केली. शिवाय पोलिसांनी प्लास्टिक बुलेटचा गोळीबार ही केला.

या घटनेचे संपूर्ण राज्यात प्रसाद उमटले असून शनिवारीही अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरू आहे. (Marathwada) शुक्रवारी पहाटे अडीच वाजताच्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी उपोषण स्थळी भेट दिली. तर शनिवारी (ता. दोन) सकाळी संभाजीराजे छत्रपती यांनी उपोषण स्थळी भेट देऊन आंदोलकांशी चर्चा केली.

शिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे देखील शनिवारी दुपारी आंदोलनस्थळी भेट देणार आहेत. दरम्यान शासनाने आरक्षण जाहीर केल्याशिवाय उपोषण मागे घेतले जाणार नसल्याची भुमिका आंदोलनकर्त्यांनी घेतलीआहे, असे उपोषणकर्ते मनोज जरांगे यांनी सांगितले. पोलिसांनी केलेल्या हल्ल्याचा व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निषेध जरांगे यांनी केला. दरम्यान उपोषण स्थळी परभणीचे खासदार संजय जाधव यांनीही भेट दिली.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com