Chhatrapati Sambhaji Nagar Constituency : खैरे राजकारणातून रिटायर्ड होणार; पण नेमकं कधी ?

Political News : 2019 च्या लोकसभा निवडणुकीत अवघ्या साडेचार हजार मतांनी पराभूत झाल्यानंतर खैरे पाच वर्षे प्रतीक्षेत होते. ही माझी शेवटची लोकसभा निवडणूक असेल, असे सांगत त्यांनी छत्रपती संभाजीनगरमधून लोकसभेची एक संधी देण्याची विनंती पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती.
Chandrakant Khaire
Chandrakant KhaireSarkarnama

Chhatrapati Sambhaji Nagar News : दोन वेळा आमदार, सलग चार वेळा लोकसभा निवडणुकीत विजय, राज्यात युतीची सत्ता असताना मंत्री, पालकमंत्री राहिलेल्या शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांना राजकारणातून निवृत्त व्हायचंय. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत अवघ्या साडेचार हजार मतांनी पराभूत झाल्यानंतर खैरे पाच वर्षे प्रतीक्षेत होते. ही माझी शेवटची लोकसभा निवडणूक असेल, असे सांगत त्यांनी छत्रपती संभाजीनगरमधून लोकसभेची एक संधी देण्याची विनंती पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती.

पक्षफुटीनंतरही एकनिष्ठ राहिलेल्या खैरे (Chandrkant Khaire) यांचा सन्मान करत ठाकरेंनी अंबादास दानवे (Amabadas Danve) यांची मागणी असताना पुन्हा एकदा खैरे यांच्यावर विश्वास दाखवला. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रचाराला लागलेले खैरे महाविकास आघाडीच्या बैठका, मतदारसंघातील मेळाव्यातून भावनिक साद घालताना दिसत आहेत. गुरुवारी झालेल्या महाविकास आघाडीच्या (MVA) संयुक्त पत्रकार परिषदेतही त्यांनी आपण राजकीय संन्यास घेणार असल्याचा पुनरुच्चार केला. (Chhatrapati Sambhaji Nagar Constituency)

Chandrakant Khaire
Loksabha Election : भाजपला धक्का! उत्तमराव जानकरांचा धैर्यशील मोहिते-पाटलांना पाठिंबा?

ही माझी शेवटची लोकसभा निवडणूक असेल, 2029 ची निवडणूक मी लढवणार नाही, असे स्पष्ट करत पाच वर्षांनी आपण राजकारणातून रिटायर्ड होणार असल्याचे संकेत दिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची येत्या 20 एप्रिल रोजी शहरात चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारार्थ सभा होणार आहे. याची माहिती देताना खैरे यांनी पुन्हा आपल्या राजकीय निवृत्तीवर भाष्य केले.

ही माझी शेवटची निवडणूक असून, पुढच्या लोकसभेला अंबादास दानवे किंवा पक्ष जो उमेदवार देईल, तो लढेल. या वेळी आपला विजय निश्चित असल्याचा दावा करतानाच हर्षवर्धन जाधव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असला तरी त्याचा परिणाम होणार नाही. पाच वर्षांपूर्वीचे वातावरण आणि सध्या जाधव यांची परिस्थिती यात फरक आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील निवडून आल्यापासून शहरातील वातावरण बिघडले आहे. पाच वर्षांत त्यांना शहरासाठी काही करता आले नाही. मी वीस वर्षे खासदार होतो तेव्हा संभाजीनगर शांत होते, मी अनेक विकासकामे केली, शहरासाठी योजना आणल्याचा दावा खैरे यांनी केला.

'आमची फाइट एमआयएमशी'

इम्तियाज जलील, भाजपचे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड यांना अजून दिल्ली समजलीच नाही, असा टोला खैरे यांनी लगावला. महायुतीशी आमचा सामना नाहीच, त्यामुळे उमेदवारी भुमरेंना मिळाली काय? किंवा आणखी कुणाला, आमची फाइट एमआयएमशी असल्याचेही खैरे यांनी स्पष्ट केले.

(Edited By : Sachin Waghmare)

R

Chandrakant Khaire
Chandrakant Khaire News : 'महायुतीत मारामाऱ्या, संभाजीनगरात मशालच पेटणार' ; चंद्रकांत खैरेंचा दावा!

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com