Thackeray Group iPhone News : ठाकरे गटामध्ये 'फोन टॅपिंग'ची धास्ती? नेत्यांना iPhone वापरण्याच्या सूचना? दानवे म्हणाले...

Maharashtra Politics: आत्ताच्या घडीला ज्याप्रमाणे राजकारण सुरू आहे, त्यानुसार...
Aaditya Thackeray, Uddhav Thackeray
Aaditya Thackeray, Uddhav Thackeray Sarkarnama
Published on
Updated on

Ambadas Danve On Phone Taping : विरोधी पक्षातील नेत्यांच्या फोन टॅपिंग करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता. आता याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने मोठा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. ठाकरे गटातील नेते, पदाधिकारी, आमदार, खासदार यांच्यासह प्रमुख व्यक्तींना फक्त आयफोन वापरण्याच्या सूचना दिल्या आहेत अशी चर्चा आहे. यावर ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देखील मोठं भाष्य केलं आहे.

राज्यात भाजप शिवसेनेचं सरकार असताना फोन टॅपिंग करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचा आरोप रश्मी शुक्ला यांच्यावर होता. २०१९ मध्ये फोन टॅपिंग प्रकरणी कुलाबा पोलिसांनी रश्मी शुक्ला यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Aaditya Thackeray, Uddhav Thackeray
Kasaba By-Election : चिंचवड पाठोपाठ कसब्यातही भाजपचं ठरलं; 'यांनी' नेला उमेदवारी अर्ज

यानंतर राज्य गुप्त वार्ता विभागाच्या आयुक्त असताना डॉक्टर रश्मी शुक्ला यांनी बेकायदेशीर फोन टॅपिंग केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. यावेळी काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही आपला फोन टॅप झाल्याचा दावा केला होता. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती.

ठाकरे गटाचे नेत्यांना आयफोन वापरण्याच्या सूचना करण्यात आल्याच्या चर्चांना उधाण आले असतानाच आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते व ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी यावर मोठं विधान केलं.

दानवे म्हणाले, आत्ताच्या घडीला ज्याप्रमाणे राजकारण सुरू आहे, त्यानुसार आपापली सुरक्षा घेण्याची गरज आहे. त्यामुळे पक्षातील प्रमुख लोकांनी आयफोन वापरला पाहिजे अशा सूचना मी जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी यांना दिल्या असल्याचे अंबादास दानवे ( Ambadas Danve) म्हणाले. याबाबत पक्षाकडून अधिकृत सूचना नाही असेही स्पष्टीकरण दिले आहे.

Aaditya Thackeray, Uddhav Thackeray
Marathwada Teacher Constituency Result : बंडखोर सोळुंके, कुलकर्णी यांना पक्षाने आणि मतदारांनीही जागा दाखवली..

मात्र, जबाबदार लोकांनी जबाबदारीने राहिले पाहिजे आणि बोलले पाहिजे. अनेकदा बोलताना चुकून चार चौघात एखादा शब्द निघून जातो. त्यामुळे रेकॉर्डिंग होते आणि त्याचा मोठा विषय बनवला जातो. अशातच काळजी घेतली पाहिजे असेही दानवे म्हणाले.

तर मागच्या काळात रश्मी शुक्ला यांना सरकराने फोन टॅपिंग करण्याचे सांगितले होते. त्यामुळे आताच्या घडीला सुद्धा सरकारचं मुद्दामहून, जाणीवपूर्वक नेत्यांच्या हालचालींवर लक्ष असते. त्यामुळे आपण आपली काळजी घेतली पाहिजे. पण त्यांचं लक्ष असे म्हणून काही घाबरून जाण्याची गरज नाही. शिवसेनेला जे काही करायचं ते समोरासमोर करते. पण तरीही मी माझ्या येथील सर्व पदाधिकारी यांना आयफोन वापरण्याच्या सूचना दिल्या असल्याचं देखील दानवे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com