Kasaba Politics : कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. ही जागा लढविण्याठी सर्व पक्षातील नेत्यांसह अनेक कार्यकर्तेही इच्छुक आहेत. सर्वच पक्षातून उमेदवारी मिळण्यासाठी अनेकांची रस्सीखेच सुरू आहे.
असे असतानाच आज मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांचे पती शैलेश टिळक यांनी कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज नेला आहे. त्यामुळे भाजपकडून शैलेश टिळक हेच उमेदवार असण्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
कसबा पोटनिवडणुकीत (Kasaba by-election) काँग्रेसकडून सोळा तर राष्ट्रवादीकडून बाराजण इच्छुक आहेत. तसेच ही निवडणूक मनसे देखील लढविण्याची शक्यता आहे. तर याच पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून पाच इच्छुकांची नावे वरिष्ठाकडे पाठवण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. मात्र, अद्याप कोणत्याच पक्षाने अधिकृत उमेदवार जाहीर केलेला नाही.
दरम्यान, दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांनी आज कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज नेला असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.