उस्मानाबाद जिल्हा बॅंक : आमदार, माजी मंत्र्यांचा मुलगा, भाऊ, पुतण्या हेच बिनविरोध

उस्मानाबाद जिल्हा बॅंकेतील 15 पैकी पाच जागा बिनविरोध झाल्या आहेत.
Rahul Mote-Tanaji Sawant
Rahul Mote-Tanaji Sawantsarkarnama
Published on
Updated on


उस्मानाबाद : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १५ संचालकांसाठी निवडणूक होत आहे. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी गुरुवारी (ता. १०) २७ उमेदवारांचे अर्ज कायम राहिले. दरम्यान, पंधरापैकी पाच जागा बिनविरोध झाल्या आहेत.. त्यामुळे आता दहा जागांसाठीच निवडणूक होत आहे. (Osmanabad district bank election)

महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी पाच जागांवर विजय मिळवीत भाजपला निवडणुकीपूर्वीच मात दिली. काँग्रेस दोन, शिवसेना दोन आणि राष्ट्रवादी काँग्रेस एक अशा पाच जागांचे पक्षीय बलाबल आहे. आजच्या दिवशी यातील वाशी व तुळजापूर या जागा बिनविरोध निघाल्या आहेत. त्यामुळे भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील विरुद्ध महाविकास आघाडी असा जोरदार सामना रंगणार आहे.

Rahul Mote-Tanaji Sawant
Video: UP निकालाचा भाजपला धसका? तब्बल अडीच वर्षांनंतर मोदींनी प्रश्नांना उत्तरे दिलीत!

बिनविरोध निवडून आलेले उमेदवार पुढीलप्रमाणे

1)बापुराव माधवराव पाटील- उमरगा, वि.का. कॉग्रेस. (माजी मंत्री बसवराज पाटील यांचे बंधू)

2)सुनिल मधुकरराव चव्हाण,-तुळजापुर वि.का. (माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे पुत्र) कॉग्रेस

3)मधुकर सुखदेव मोटे--भूम वि.का. (आमदार राहुल मोटे यांचे बंधू)राष्ट्रवादी कॉग्रेस

4)आमदार ज्ञानेश्वर रावसाहेब पाटील, परंडा वि.का.

5)विक्रम उत्तम सावंत --वाशी वि.का. (माजी मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे) शिवसेना

Rahul Mote-Tanaji Sawant
औरंगाबादेतील राष्ट्रवादीचा भोपळा अजितदादांना सलतोय...तो फोडण्यासाठी काॅंग्रेसचा नेता फोडला!

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक प्रक्रियेतील अत्यंत महत्त्वाचा टप्पा गुरुवारी पूर्ण झाला. लढत कशी होणार हे आता स्पष्ट झाले. निवडणुकीसाठी १६४ अर्ज दाखल झाले होते. पंधरा जागांसाठी एवढ्या अर्जामुळे ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची होणार हे उघड होते. त्यानंतर छाननीमध्ये त्यातील ९० अर्ज शिल्लक राहिले होते. माघारीसाठी दिलेल्या कालावधीमध्ये फार मोजक्या लोकांनी अर्ज मागे घेतले. त्यातही शेवटपर्यंत बिनविरोधासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे सांगितल्याने निवडणूक होणार की नाही यावर चर्चा सुरू होती. मात्र, अर्ज माघारीच्या दिवशी ही चर्चा फक्त चर्चाच राहिल्याचे दिसून आले आहे. शेवटच्या दिवशी आणखी दोन जागा बिनविरोध निघाल्या असल्या तरी दहा जागांसाठी २७ जणांचे अर्ज शिल्लक राहिल्याचे दिसून येत आहे. या निवडणुकीत भाजपविरुद्ध महाविकास आघाडीतील तीनही पक्ष एकत्र आले आहेत.

Rahul Mote-Tanaji Sawant
सोमय्या हल्लाप्रकरणी अजित पवार म्हणाले, ‘होय...केंद्रीय गृहविभागाची टीम पुण्यात आलीय’!

वेळ संपल्यानंतर बिनविरोधासाठी चर्चा
भाजपविरोधात महाविकास आघाडी अशी थेट लढत होणार असून, बिनविरोधाचा दावा फोल ठरला आहे. उमेदवारी अर्ज माघारीचा वेळ संपल्यानंतर निवडणूक बिनविरोध करत असल्याचा चर्चा केवळ फार्स असल्याचे यावेळी दिसून आले. जिल्हा निवडणूक अधिकारी सुनील शिरापूरकर यांनी सर्वपक्षीय नेत्यांना वेळ संपल्याचे सांगून चोख भूमिका बजावली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com