मुंबई : भारतीय जनता पक्षाचे (bjp) परभणीतील नेते, माजी आमदार विजय गव्हाणे (Vijay Gavahane) यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (ncp) प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांच्या उपस्थितीत गव्हाणे यांचा मुंबईत हा पक्षप्रवेश होणार आहे. (Former BJP MLA Vijay Gawhane will join NCP)
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांच्या उपस्थितीत गव्हाणे हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. मुंबईतील राष्ट्रवादीच्या कार्यालयात येत्या गुरुवारी हा पक्षप्रवेशाचा सोहळा होणार आहे.
गेल्या वीस वर्षांपासून गव्हाणे हे भारतीय जनता पक्षात निष्ठावंत म्हणून काम करत होते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून ते पक्षावर नाराज होते. निष्ठावंत कार्यकर्त्यांवर भाजपमध्ये अन्याय होत असल्याचा आरोप गव्हाणे यांनी भाजपला रामराम करण्यापूर्वी केला आहे. भाजपत आपली अवहेलना होत असल्याची खंत गव्हाणे यांना होती, त्यातूनच त्यांनी भाजपचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश जाणार असल्याचे जाहीर केले आहे.
भारतीय जनता पक्षाचे कार्यक्रम, पक्षीय बैठका, राजकीय घडामोडींपासून विजय गव्हाणे हे गेल्या काही दिवसांपासून दूर होते. त्यामुळे नाराज गव्हाणे हे भाजप सोडतील, अशी चर्चा रंगली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार फौजिया खान यांनी पडद्याआडून हालचाली केल्या आणि गव्हाणे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. गव्हाणे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे परभणी जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.