MLA Ramesh Bornare : शिवसेनाविरुद्ध शिवसेना 'सामना'; वैजापूरमध्ये राजकीय उलथापालथींना वेग

Former Vaijapur MLA Bhausaheb Patil Chikatgaonkar quit Shiv Sena Thackeray party : छत्रपती संभाजीनगरमधील वैजापूर विधानसभा मतदारसंघात राजकीय उलथापालथींना वेग आला आहे.
MLA Ramesh Bornare
MLA Ramesh BornareSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वैजापूर विधानसभा मतदारसंघात काल मोठी राजकीय घडामोड झाली. दोन वर्षांपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केलेले माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी अचानक पक्षाला 'जय महाराष्ट्र' केला.

पक्षात घेताना शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेला उमेदवारीचा शब्द फिरवण्याचा आरोप करत चिकटगावकर यांनी वेगळा निर्णय घेतला आहे.

या पार्श्वभूमीवर विद्यमान आमदार रमेश बोरणारे यांच्या विरोधात ठाकरे गट नवा चेहरा मैदानात उतरवण्याची तयारी करत आहे. काँग्रेसमधून भाजपमध्ये (BJP) प्रवेश केलेले वैजापूरचे माजी नगराध्यक्ष दिनेश परदेशी येत्या 17 तारखेला उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेची मशाल हाती घेणार असल्याची माहिती आहे. परदेशी यांच्या शिवसेना प्रवेशामुळेच आपला पत्ता कट होणार, याची जाणीव भाऊसाहेब चिकटगावकर यांना झाली. यातूनच त्यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेत नवीन मार्ग निवडणुकीपूर्वीच निवडत आहे, असे बोलले जात आहे.

वैजापूर विधानसभा मतदारसंघ पूर्वीपासून शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. आजही या मतदारसंघात शिवसेनेची ताकद मोठ्या प्रमाणात आहे. मात्र पक्षफुटीनंतर ती विभागली गेली, हे नाकारून चालणार नाही. रमेश बोरणारे यांनी पक्षाशी गद्दारी केली असली, तरी हा रोष कमी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून भरघोस निधी मतदार संघात आणत त्यांनी तो कमी करण्याचा प्रयत्न केला. याचा कितपत फायदा त्यांना विधानसभा निवडणुकीत होतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

MLA Ramesh Bornare
Imtiaz Jaleel News : एमआयएमची खेळी, मंत्री अतुल सावे यांच्याविरोधात इम्तियाज जलील ?

शिवसेना (Shiv Sena) पक्षात सुरू झालेल्या या नाराजी नाट्याचा विद्यमान आमदार रमेश बोरणारे यांना फायदा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली दोन वर्षांपूर्वी शिवसेनेत झालेल्या बंडात वैजापूर विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदाच आमदार झालेल्या बोलणारे यांनी शिंदेंना साथ देण्याचा निर्णय घेतला, तेव्हापासून बोरणारे यांच्या कपाळी गद्दारीचा शिक्का बसला.

चिकटगावकर यांना कौटुंबिक कलहाचा फटका

दुसरीकडे शिवसेनेतील नाराजी नाट्याचा फटका निवडणूक लढवू पाहणाऱ्या दिनेश परदेशी यांनाही बसू शकतो. भाऊसाहेब पाटील चिकटगावकर 2014 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदार होते. नातीगोती आणि मतदार संघातील दांडगा जनसंपर्क ही त्यांची बलस्थाने आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पक्षातून पुतण्याकडून आव्हान दिले गेल्यानंतर राजकारणामुळे कौटुंबिक कलह नको, अशी भूमिका घेत चिकटगावकर यांनी माघार घेतली.

MLA Ramesh Bornare
Shivsena UBT News : ठाकरेंनी शब्द फिरवला, माजी आमदाराचा पक्षाला जय महाराष्ट्र..

शिवसेनेला हा प्रयोग कितपत यशस्वी होणार

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने केलेला हा प्रयोग त्यांच्या अंगलट येऊन हातची जागा गेली होती. स्वतःचे राजकीय पुनर्वसन करून घेण्यासाठीच भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र दोन वर्ष मतदार संघात तयारी करत असताना ऐनवेळी शिवसेनेकडून आपल्याला उमेदवारी नाकारली जाणार, हे लक्षात येतात चिकटगावकर यांनी सावध पवित्रा घेत दोन महिने आधीच पक्षाला 'जय महाराष्ट्र' केला. पुढे ते काय निर्णय घेतात यावरही वैजापूर विधानसभा मतदारसंघातील चित्र ठरणार आहे.

'या' भूमिका महत्त्वाच्या ठरणार

वैजापूरची जागा खेचून आणण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाने जोरदार प्रयत्न सुरू केलेत. मात्र ऐनवेळी भाजपच्या नेत्याला पक्षात घेऊन उमेदवारी देण्याचे धाडस कितपत यशस्वी होते? हे निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होईल. वैजापूरमध्ये शिवसेनाविरुद्ध शिवसेना, असा थेट 'सामना' अपेक्षित असला तरी मराठा आरक्षण, मनोज जरांगे यांची भूमिका तितकीच महत्त्वाची ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com