Latur NCP Politics : काँग्रेसने मतदारसंघावर दावा सांगताच विनायक पाटील पोहचले गढीवर ..

Ahmadpur Assembly Constituency : भाजपमधून गेल्याच वर्षी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या विनायक पाटील यांना अहमदपूर-चाकूर मतदारसंघातून पुन्हा निवडणूक लढवायची आहे.
EX.MLA Vinayak Patil Meet Amti Deshmukh
EX.MLA Vinayak Patil Meet Amti DeshmukhSarkarnama
Published on
Updated on

Congress-NCP News : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे माजी आमदार विनायक पाटील यांनी लातूरचे काँग्रेस आमदार तथा माजी मंत्री अमित देशमुख यांची काल भेट घेतली. विशेष म्हणजे दोन दिवसापुर्वी अहमदपूर-चाकूर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी ही जागा काँग्रेससाठी सोडवून घ्या, अशी मागणी करत निवेदन दिले होते.

तातडीने या मतदारसंघाचे माजी आमदार आणि आता राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर या पक्षाकडून इच्छूक असलेल्या विनायक पाटील यांनी अमित देशमुख (Amit Deshmukh) यांची त्यांच्या बाभळगांव येथील निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली. भाजपमधून गेल्याच वर्षी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या विनायक पाटील यांना अहमदपूर-चाकूर मतदारसंघातून पुन्हा निवडणूक लढवायची आहे.

राज्यात महाविकास आघाडी येणारी विधानसभा निवडणूक एकत्रितपणे लढवणार आहे. आघाडीत हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला येतो. मात्र पक्ष फुटीनंतर हा मतदारसंघ काँग्रेसला सोडवून घ्या, अशी आग्रही मागणी तालुक्यातील काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. आतापर्यंत काँग्रेसने पाच वेळा या मतदारसंघातून विजय मिळवलेला आहे.

EX.MLA Vinayak Patil Meet Amti Deshmukh
Latur Politics : राष्ट्रवादीत फूट पडताच काँग्रेसकडून अहमदपूर-चाकूर मतदारसंघावर दावा..

भाजपने तीन वेळा, राष्ट्रीय समाज पक्ष, अपक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसने या मतदारसंघात प्रत्येक एक विजय मिळवला आहे. विद्यमान आमदार बाबासाहेब पाटील हे 2019 मध्ये राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडून आले होते. त्यांनी भाजपच्या विनायक पाटील यांचा 29 हजार मतांच्या फरकाने पराभव केला होता. त्याआधी 2014 मध्ये विनायक पाटील हे या मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर निवडून आले होते. (Mahavikas Aghadi)

दरम्यान गेल्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर विनायक पाटील यांनी भाजपला रामराम ठोकत ऑक्टोबर 2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. 2024 मध्ये पुन्हा उमेदवारी मिळवण्याच्या दृष्टीने त्यांचा हा प्रवेश महत्वाचा समजला जातो. मात्र मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसकडूनच या मतदारसंघावर दावा केला जात असल्याने विनायक पाटील यांच्या अडचणी वाढल्याचे चित्र आहे.

EX.MLA Vinayak Patil Meet Amti Deshmukh
Congress : मुस्लिम अल्पसंख्याक आघाडी आक्रमक; विधानसभेच्या त्या 14 जागांसाठी काँग्रेस प्रभारींची मागितली वेळ...

या पार्श्वभूमीवर त्यांनी काल अमित देशमुख यांची घेतलेली भेट महत्वाची समजली जाते. यावेळी पाटील यांच्यासोबत त्याचे काही सहकारी होते. यावेळी त्यांच्यासोबत विविध विषयांवर चर्चा पार पडली. या भेटीनंतर काँग्रेस अहमदपूर-चाकूर विधानसभा मतदारसंघावरील दावा सोडून आघाडी धर्म पाळणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com