Mahavikas Aghadi : जलील यांना चुकून निवडून आलेले खासदार म्हणत खैरेंनी ठोकला शड्डू!

Chandrakant Khaire : माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचे खासदार इम्तियाज जलील यांच्यावर गंभीर आरोप केले.
Chandrakant Khaire
Chandrakant KhaireSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये आज महाविकास आघाडीची संयुक्त सभा होत आहे. या सभेला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अजित पवार, अशोक चव्हाण यांच्यासह महाविकास आघाडीचे दिग्गज नेते उपस्थित आहेत. यावेळी बोलताना माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी शिंदे - फडणवीस सरकारवर आणि इम्तियाज जलील यांच्यावर जोरदार टीका केली.

चंद्रकांत खैरे म्हणाले, ''महाविकास आघाडीची ही'वज्रमुठ' सभा होऊ न देण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. दोन गटात भांडण लावून सभा रद्द करण्याचा काहींचा प्रयत्न होता. मुख्यमंत्री सकाळी वीर सावरकर गौरव यात्रा काढतात. त्यांच्या सभेला परवानगी देण्यात येते. पण आमच्या सभेला रात्री परवानगी दिली. पण महाविकास आघाडी ही या 'वज्रमूठ' सभेच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी आहे'', असं ते म्हणाले.

Chandrakant Khaire
Rahul Gandhi News : राहुल गांधींची खासदारकी वाचणार का? : सूरत सत्र न्यायालयात उद्या आव्हान देणार

''आमच्या गाड्या सभेपासून लांब थांबवल्या गेल्या. आम्हाला मुद्दाम त्रास देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. गेल्या 28 वर्षात आम्ही कुठेही अशांतता होऊ दिली नाही. पण चुकून निवडून आलेले इम्तियाज जलील हे खासदार झाले तेव्हापासून दंगली घडत आहेत'', असा गंभीर आरोप चंद्रकांत खैरे यांनी यावेळी केला.

Chandrakant Khaire
Mahavikas Aghadi : महाविकास आघाडीच्या सभेला नानांची अनुपस्थिती; कारण आले समोर...

''इम्तियाज जलील यांनी या शहराच्या नामांतराच्या निर्णयाला विरोध केला. त्यासाठी त्यांनी एक महिना आंदोलन केलं. पण तरी देखील त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली नाही. कारण पोलिसांवर नागपूरचा दबाव होता. पण असं असेल तर भविष्यात आमचं राज्य पुढे येणारच आहे'', असं म्हणत त्यांनी विरोधकांना इशारा दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com