Nana Patole
Nana PatoleSarkarnama

Mahavikas Aghadi : महाविकास आघाडीच्या सभेला नानांची अनुपस्थिती; कारण आले समोर...

Nana Patole : महाविकास आघाडीची एकत्रित मोठी जाहीर सभा आज पार पडत आहे.
Published on

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये आज महाविकास आघाडीची संयुक्त सभा होत आहे. या सभेला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अजित पवार, जयंत पाटील, अशोक चव्हाण यांच्यासह महाविकास आघाडीचे दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. मात्र, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले या सभेला अनुपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.

महाविकास आघाडीच्या या 'वज्रमुठ' सभेला महाविकास आघाडीतील महत्वाचा पक्ष असलेल्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हेच अनुपस्थित राहणार असल्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे. मात्र, नाना पटोले यांची प्रकृती ठिक नसल्यामुळे ते या सभेला उपस्थित राहणार नाहीत, असं सांगण्यात आलं आहे.

Nana Patole
Shivsena Group News : एकनाथ शिंदे हे `नायक` सिनेमातील मुख्यमंत्र्यांसारखेच लोकप्रिय!

महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांचे महत्वाचे नेते या सभेला उपस्थित राहणार आहेत. पण नाना पटोले हे प्रकृतीच्या कारणास्थव उपस्थित राहणार नसल्यामुळे काँग्रेसकडून अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात हे उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Nana Patole
Chandrakant Khaire On Shirsat News : शिरसाटांनी वर खोके दिले नाही, म्हणून त्यांना मंत्रीपद मिळाले नाही का ?

दरम्यान, या सभेच्या माध्यमातून महाविकास आघाडीतील नेते सत्ताधाऱ्यांवर काय बोलणार? तसेच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काही बोलणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com