Santosh Deshmukh : सरपंच म्हणून राज्य पुरस्कार पटकावण्याचे होते संतोष देशमुख यांचे स्वप्न!

Santosh Deshmukh dream remained unfulfilled : मस्साजोग येथील संतोष पंडितराव देशमुख हे डिसेंबर 2022 च्या ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झाले होते. पाच वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नी अश्विनी देशमुख या गावच्या सरपंच होत्या.
Santosh Deshmukh
Santosh DeshmukhSarkarnama
Published on
Updated on

रामदास साबळे

Beed News: तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख आणि पत्नी अश्विनी देशमुख या सरपंच दांपत्याने गावात वृक्ष लागवड, जलसंधारण, वैयक्तिक शौचालय, शोषखड्डे, सांडपाणी व्यवस्थापन अशी विकासकामे केल्याने या गावाला संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान व आर. आर. पाटील सुंदर गाव या दोन अभियानात जिल्हास्तरावर प्रथम क्रमांकाचे पुरस्कार मिळाले. गावाला विभागीय आणि राज्यस्तरावर पुरस्कार मिळवून देण्याचे देशमुख यांचे स्वप्न अधुरे राहिल्याने आज गावकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू तरळत आहेत.

मस्साजोग येथील संतोष पंडितराव देशमुख हे डिसेंबर 2022 च्या ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झाले होते. पाच वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नी अश्विनी देशमुख या गावच्या सरपंच होत्या. देशमुख दांपत्याने गावात जलसंधारण, वृक्ष लागवड, वैयक्तिक शौचालय, सार्वजनिक शौचालय, शोषखड्डे करत सांडपाण्याचे व्यवस्थापन अशी कामे केली.

Santosh Deshmukh
Beed Murder Case News : सरपंच खून प्रकरणातील तिसरा संशयित अटकेत! पुण्याजवळील रांजणगावातून उचलले..

पाण्याच्या गुणवत्ता तपासणीसह नळजोडणीची कामे केली. घनवन प्रकल्प व लसीकरण सत्र नियमिततेसह ग्रामपंचायतीचे 1 ते 33 नमुने ऑनलाइन करून घेतले. ग्रामपंचायतीमार्फत वीज बिल भरणा, वृक्ष लागवड रजिस्टर अद्ययावत केले. त्याच्या या कामाची दखल जिल्हास्तरावर घेतली गेली.

Santosh Deshmukh
Dhananjay Munde : धनंजय मुंडे म्हणतात, जिल्ह्याची बदनामी करू नका; अन् त्यांचा विश्वासूच अडकला खंडणी प्रकरणात!

माजी खा. डॉ. प्रीतम मुंडे यांच्या हस्ते पुरस्कार तत्कालीन सरपंच अश्विनी देशमुख, संतोष देशमुख स्वीकारला होता. आता मात्र देशमुख यांच्या जाण्याने कुटुंब उघड्यावर पडल्याचे चित्र आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या पश्चात कुटुंबात वडील पंडितराव, आई शारदा, भाऊ धनंजय आणि पत्नी अश्विनी एक मुलगी, मुलगा असा परिवार आहे. मुलगी वैभवी ही सध्या बारावीत तर मुलगा विराज 7 वीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. देशमुख यांच्या मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Santosh Deshmukh
Ambadas Danve : राजकीय दबावात काम करु नका, अंबादास दानवेंनी घेतली बीड एसपींची भेट!

गावासाठी मेहनत करून दोन पुरस्कार पटकावले

2022 मध्ये मस्साजोग ग्रामपंचायतीला 50 लाख रुपयांचा आर. आर. पाटील सुंदर गाव जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार माजी खा. डॉ. प्रीतम मुंडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला होता. हा पुरस्कार पटकावताना त्यांना ग्रामसेवक दत्तात्रय गव्हाणे यांची साथ मिळाली. तर, 2018 - 2019 मध्ये संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानातून गावात केलेल्या स्वच्छतेच्या कामामुळे गावाला जिल्ह्यात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला होता.

Santosh Deshmukh
Beed Murder Case News : मस्साजोग सरपंच खून प्रकरण; पंकजा मुंडे 'मोठा मुद्दा' घेऊन CM फडणवीसांना भेटणार

मस्साजोग येथील सरपंचपदाची सूत्रे देशमुख दांपत्याकडे आल्यानंतर या दांपत्याने शासनाच्या विविध योजना राबवून गावाचा विकास साधला. दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांनी गावाचे नाव जिल्ह्याच्या पटलावर आणण्यासाठी धडपड केली. परंतु त्यांच्या मृत्यूमुळे स्वच्छता अभियान, सुंदर गाव विभागीय व राज्यस्तरीय पुरस्कार मिळवून गावाचा आणखी गौरव वाढवण्याचे स्वप्न अर्धवट राहिले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com