Ambadas Danve : राजकीय दबावात काम करु नका, अंबादास दानवेंनी घेतली बीड एसपींची भेट!

Ambadas Danve Meets Beed SP : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या गंभीर प्रकरणी कारवाई करण्याचे, निवेदनही यावेळी पोलिस अधिक्षकांना देण्यात आले.
Ambadas Danve
Ambadas DanveSarkarnama
Published on
Updated on

Beed News : केज तालुक्यातील मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने बीडसह महाराष्ट्र हादरला आहे. या खून प्रकरणानंतर राजकीय वातावरणही चांगलेच तापले आहे. बीड पोलीस राजकीय दबावात काम करत असून आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी केला होता.

एवढेच नाही तर बीड जिल्ह्यातील खून, अपहरणासारख्या घटनांची सीबीआय चौकशी करा, अशी मागणी सोनवणे यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन केली. या पार्श्वभूमीवर आज विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी बीडचे पोलिस अधिक्षक अविनाश बारगळ यांची भेट घेतली. कोणाच्या राजकीय दबावाला बळी न पडता खून प्रकरणातील आरोपींवर तातडीने कारवाई करा, अशा सूचना दानवे यांनी यावेळी दिल्या.

Ambadas Danve
Beed Murder Case News : सरपंच खून प्रकरणातील तिसरा संशयित अटकेत! पुण्याजवळील रांजणगावातून उचलले..

मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची राजकीय सुडातून हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी आरोपींवर तातडीने कारवाई करा. पोलिस या प्रकरणी हलगर्जीपणा करीत असून, फक्त राजकीय नेत्यांच्या दबावात काम करत आहेत,असे दिसतयं, अशी नाराजी दानवे यांनी या भेटीत व्यक्त केली. या संपुर्ण प्रकरणाची महिती पोलीस यंत्रणेकडून अंबादास दानवे यांनी घेतली.

Ambadas Danve
Beed Murder Case News : मस्साजोग सरपंच खून प्रकरण; पंकजा मुंडे 'मोठा मुद्दा' घेऊन CM फडणवीसांना भेटणार

आतापर्यंत या प्रकरणात तिघांना अटक करण्यात आली आहे. तर इतर फरार आरोपींच्या शोधासाठी बीड गुन्हे शाखेची दोन पथके रवाना करण्यात आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या गंभीर प्रकरणी कारवाई करण्याचे, निवेदनही यावेळी पोलिस अधिक्षकांना देण्यात आले. दरम्यान संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणानंतर चोवीस तासांनी त्यांच्या मृतदेहाचे पोस्टमार्टम करण्यात आले. तर तब्बल 33 तासांनी अंत्यसंस्कार.

Ambadas Danve
ShivSena Politics : मुंबई महापालिकेसाठी ठाकरेंची फिल्डिंग; संघटना बांधणीचा हा आहे 'प्लॅन'

या प्रकरणामुळे अजूनही बीड जिल्ह्यातील वातावरण तापलेले आहे. कायदा व सुव्यवस्थेची जिल्ह्यातील परिस्थिती गंभीर असून याला जबाबदार लोकांवर वेळीच कारवाई करावी, अशी मागणी जिल्ह्यातील नागरिकांकडून केली जात आहे, याकडेही दानवे यांनी पोलिस अधिक्षकांचे लक्ष वेधले. याप्रसंगी जिल्हाप्रमख परमेश्वर सातपुते, गणेश वरेकर, जिल्हा संघटक नितिन धांडे,उपजिल्हाप्रमख राजू महुवाले व शहरप्रमुख शेख निझाम उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com