CM Fadnvis-Chandrakant Khaire News : मुख्यमंत्री फडणवीस-खैरे भेटीतील 'त्या' पार्सलची जोरदार चर्चा

What are the parcels that Khaire mentioned to Chief Minister Fadnavis? : एकाच जिल्ह्यात, एकाच पक्षात दोन सत्ता केंद्र तयार झाल्याने पदाधिकारी आणि सामन्य शिवसैनिक वैतागले आहेत. पण मुंबईतील नेते याकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याने पक्षाला गळती लागली आहे.
Khaire- Danve-Fadnavis- news
Khaire- Danve-Fadnavis- newsSarkarnama
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन दिवसापुर्वी छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आले होते. हा त्यांचा खासगी दौरा होता, पण या दौऱ्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी फडणवीसांची घेतलेली भेट जरा जास्तच चर्चेत आली आहे. त्याचे कारणही तसेच खास म्हणावे लागेल. मुख्यमंत्री पदी विराजमान झाल्याबद्दल खैरे यांनी फडणवीसांचा भगवी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत-सत्कार केला.

त्यानंतर भाजप पदाधिकाऱ्याच्या मुलाच्या लग्न सोहळ्यातील भोजन पंगतीत खैरे (Chandrakant Khaire) यांनी मुख्यमंत्री फडवीस यांना 'तुमचे एक पार्सल आमच्याकडून घेऊन जा' , असे म्हटले. चाणाक्ष मुख्यमंत्र्यांच्या हे लागलीच लक्षात आले, की खैरेंचा नेमका रोख कोणाकडे आहे? पण भोजन कक्षातील पंगतीवर मिडियाचे कॅमेरे रोखले गेलेले आहे, हे लक्षात येताच सावध झालेल्या मुख्यमंत्र्यांनी 'त्या पार्सलची चर्चा अशी जाहीरपणे करता येणार नाही', असे म्हणत वेळ मारून नेली.

Khaire- Danve-Fadnavis- news
Chandrkant Khaire On Fadanvis : फडणवीसांनी आता गप्प बसावे, गद्दारांना सांभाळून त्यांची तब्यत उतरली...

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शिवसेनेत चंद्रकांत खैरे विरुद्ध अंबादास दानवे (Ambadas Danve) हा संघर्ष नवा नाही. या दोघांच्या मतभेद आणि वर्चस्वाच्या लढाईत पक्षाची वाट लागल्याचा आरोप स्थानिक पदाधिकारी आणि नेते खासगीत बोलताना करत असतात. 2019-2024 अशा सलग दोन लोकसभा निवडणुकीतील पराभव आणि नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची पाटी कोरी राहण्याला खैरे-दानवे यांच्यातील वादच कारणीभूत असल्याचे बोलले जाते.

Khaire- Danve-Fadnavis- news
Ambadas Danve-Eknath Shinde News : 'No caption needed'! एकनाथ शिंदे हतबल, अंबादास दानवेंनी साधला निशाणा

एकाच जिल्ह्यात, एकाच पक्षात दोन सत्ता केंद्र तयार झाल्याने पदाधिकारी आणि सामन्य शिवसैनिक वैतागले आहेत. पण मुंबईतील नेते याकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याने पक्षाला गळती लागली आहे. अशातच राज्यात महायुतीची सत्ता आल्याने या गळतीचे रुपांतर येणाऱ्या काळात 'भगदाड' स्वरुपात होऊ शकते. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खैरे पक्षात पुन्हा सक्रीय झाले आहेत.

Khaire- Danve-Fadnavis- news
Shivsena UBT : 'शेख हसीना लाडकी बहीण पण बांगलादेशातील हिंदू भाऊ बहि‍णींचे काय?', उद्धव ठाकरेंची शिवसेना आक्रमक

शहरातील वाढती गुन्हेगारी, वाहतुक कोंडीच्या प्रश्नावर पोलिस आयुक्तांची भेट घेऊन खैरे यांनी आठवडाभरात कारवाई झाली नाही तर मशाल मोर्चा काढण्याचा इशारा दिला. पदाधिकारी, शिवसैनिकांच्या स्वतंत्र बैठका घेत खैरे आता दानवेंना थेट भिडण्याच्या तयारीत आहेत.अशातच दोन दिवसांपुर्वी खैरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत 'आमच्याकडचे तुमचे एक पार्सल घेऊन जा' अशी मागणी केली.

Khaire- Danve-Fadnavis- news
Devendra Fadnavis : "गृहमंत्रिपद आमच्याकडेच असावं असा हट्ट नाही..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य

ते पार्सल म्हणजे शिवसेनेचे नेते अंबादास दानवे तर नव्हे? याची चर्चा आता जिल्ह्याच्या राजकारणात सुरू झाली आहे. अंबादास दानवे हे कधी काळी भाजपमध्ये होते. पंरतु काही कारणामुळे त्यांना भाजपमधून काढण्यात आले होते. त्यानंतर शिवसेनेत आलेल्या दानवे यांनी पक्षावर अशी काही पकड मिळवली की आता त्यांच्या शब्द उद्धव ठाकरे देखील खाली पडू देत नाहीत.

Khaire- Danve-Fadnavis- news
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना पुन्हा नव्या उभारीची गरज

दानवेंचे मातोश्रीवर वाढत असलेले वजन खैरेंसाठी डोकेदुखी ठरत आहे. ही डोकेदुखी कायमची कमी करण्यासाठीच खैरेंनी फडणवीस यांच्याशी झालेल्या संवादामध्ये `तुमचे पार्सल घेऊन जा`, अशी मागणी केल्याचे दिसते. आता या पार्सल संदर्भात मुख्यमंत्री किती गांभीर्याने विचार करतात? हे पहावे लागेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com