Maharashtra BJP : पद, निवडणुकीत उमेदवारी पाहिजे तर सदस्य नोंदणी वाढवा; भाजपचा फंडा!

BJP Membership Drive 2025 : छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीसाठी तशी तयारी सुरू करण्यात आली आहे. भाजप सदस्य नोंदणी हा त्याचाच एक भाग असल्याची चर्चा आहे.
BJP Flag
BJP FlagSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar: राज्यभरात भाजपकडून (BJP) सदस्य नोंदणी अभियान सुरू करण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात या अभियानाला मंत्री अतुल सावे, खासदार डाॅ. भागवत कराड, शहर-जिल्हाध्यक्ष शिरीष बोराळकर यांच्या उपस्थितीत रविवारी सुरूवात झाली. आगामी महापालिका, जिल्हा परिषद, नगर परिषद, पंचायत समिती अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवत भाजपने पक्षाकडून उमेदवारी, संघटनात्मक पद घेऊ इच्छिणाऱ्यांना टार्गेटच दिले आहे.

अडीचशे नव्या सदस्यांची नोंद करणाऱ्या कार्यकर्त्यालाच पक्ष निवडणुकीत उमेदवारी किंवा संघटनेत पद देतांना प्राधान्य देणार असल्याचे बोलले जाते. सदस्य नोंदणीसाठी सुरू केलेल्या भाजपच्या या फंड्याची जिल्हाभरात चर्चा होत आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप महायुतीला संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) जिल्ह्यासह मराठवाड्यात मोठे यश मिळाले.

BJP Flag
BJP-UBT News: भाजप, ठाकरे गट एकत्र येणार ? 'या' बड्या नेत्याच्या दाव्याने राजकारणात मोठा 'ट्विस्ट'

लोकसभा, विधानसभा निवडणुका या नेत्यांच्या असतात, पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत खऱ्या अर्थाने पक्षासाठी झटणाऱ्या सामान्य कार्यकर्ता, पदाधिकाऱ्याला संधी मिळत असते. त्यामुळे लोकसभा, विधानसभा निवडणुकीत महायुती एकत्र लढली असली तरी महापालिका, जिल्हा परिषद व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवून शतप्रतिशत भाजपा आणण्याचा स्थानिक नेते मंडळीचा प्रयत्न आहे.

BJP Flag
Municipal Corporation Election: महापालिका स्वबळावर लढण्याची खुमखुमी! पण एमआयएमची भितीही..

छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीसाठी तशी तयारी सुरू करण्यात आली आहे. भाजप सदस्य नोंदणी हा त्याचाच एक भाग असल्याची चर्चा आहे. या सदस्य नोंदणी अभियानाच्या माध्यमातून महापालिका क्षेत्रात एक लाख नवे सदस्य करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. आतापर्यंत सदस्य नोंदणी अभियानात छत्रपती संभाजीनगर जिल्हा मराठवाड्यात पहिल्या तर राज्यात तिसऱ्या क्रमांकावर असल्याचा दावा केला जातो आहे.

BJP Flag
Mahayuti News : ...तर आम्ही स्वबळावर निवडणुका लढवू; महायुतीमधील बड्या नेत्याने दिला इशारा

शहरातील तब्बल 1117 मतदान केंद्रांवर सदस्य नोंदणी मोहिम राबवली जात आहे. जो कार्यकर्ता अडीचशे सदस्य नोंदणी करेल त्याचाच विचार आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत उमेदवारी देतांना विचार केला जाईल. तसेच संघटनेत पद देताना देखील त्याचे या मोहिमेतील योगदान पाहिले जाईल, असे सांगितले जाते. आधीच महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकांना चार साडेचार वर्ष झाली आहेत. त्यामुळे नगरसेवक, जिल्हा परिषद होऊ पाहणाऱ्या इच्छुकांनाही आता घाई झाली आहे. अशावेळी भाजपची सदस्य नोंदणी मोहिम निश्चितच यशस्वी होणार, असा विश्वास नेत्यांना आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com