Ashok Chavan : अशोक चव्हाण यांच्याकडून इंधन दरवाढीचे समर्थन; म्हणाले, संकटातही भारत ठामपणे उभा!

global fuel crisis News : भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांनी मात्र इंधन दरवाढीचे समर्थन करतांना भारत जागतिक संकटासमोर ठामपणे उभा असल्याचे म्हटले आहे.
Ashok Chavan On Opration Sindoor News
Ashok Chavan On Opration Sindoor NewsSarkarnama
Published on
Updated on

Petrol Price Hike News : पश्चिम आशियातील युद्धाचा फटका भारतासह जगातील अनेक राष्ट्रांना बसला आहे. विशेषतः गॅस, पेट्रोल, डिझेलचा तुटवडा आणि आता इंधनाचे दर वाढल्याने सर्वसामान्यांना महागाईचे चटके बसू लागले आहेत. पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर तीन रुपयांनी वाढ झाल्यानंतर याबद्दल प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांनी मात्र इंधन दरवाढीचे समर्थन करतांना भारत जागतिक संकटासमोर ठामपणे उभा असल्याचे म्हटले आहे. हा दावा करताना अशोक चव्हाण यांनी जगभरातील देशांमध्ये इंधनाचे गगनाला भिडलेले दर आणि भारतात नाममात्र झालेली वाढ याची तुलना करणारा तक्ताच आपल्या सोशल मिडियावरील पोसर्टमधून मांडला आहे.

Ashok Chavan On Opration Sindoor News
Narendra Modi fuel crisis : महत्वाची बातमी : PM मोदींच्या आवाहनाने खळबळ उडालेली असतानाच पेट्रोलियम मंत्र्यांनी जाहीर केली इंधन साठ्याची स्थिती

पश्चिम आशियातील संकटानंतर जगभरात इंधनाचे दर गगनाला भिडले असताना भारत मात्र जागतिक संकटासमोर ठामपणे उभा राहिला, असा दावा करतानाच जागतिक स्तरावर पेट्रोलच्या किंमतीत झालेली प्रचंड वाढ त्यांनी अधोरेखित केली आहे. यात पाकिस्तानमध्ये इंधनाचे दर तब्बल 55 टक्क्यांनी वाढले आहेत. तर मलेशिया 56%, अमेरिका ४५%, युएई (UAE) 52%, तर म्यानमारमध्ये 90% इंधन दरवाढ झाली आहे.

Ashok Chavan On Opration Sindoor News
Ministers Convoy: जनतेच्या मनासारखं! CM फडणवीसांसह सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या निम्यावर

अनेक देशांमध्ये डिझेलच्या किंमती 50 ते 100 टक्क्यांनी वाढल्या. पण भारतात? पेट्रोल फक्त 3.2 तर डिझेल 3.4% एवढ्याच दराने वाढले आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे वाढते दर आणि 'होर्मुझच्या सामुद्रधुनी'मधील विस्कळीत पुरवठ्यानंतरही सलग 76 दिवस मोदी सरकारने या महागाईचा भार सामान्य जनतेवर पडू दिला नाही, तर तो स्वत: घेतला, याबद्दल अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी केंद्रातील मोदी सरकारचे कौतुक केले आहे.

Ashok Chavan On Opration Sindoor News
PM Modi Convoy Cut : पेट्रोल-डिझेल संकटाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींचे 'SPG'ला ताफा कमी करण्याचे आदेश

जगातील बहुतांश देशांनी महागाईचा थेट फटका आपल्या जनतेला दिला, तर भारताने मध्यमवर्गीय कुटुंबे, वाहतूक खर्च, अन्नधान्याचे भाव आणि महागाईवर नियंत्रण ठेवले आहे. अनेक प्रगत देशांमध्ये परिस्थिती गंभीर झालेली असतानाना भारत मात्र या जागतिक संकटांचा खंबीरपणे सामना करतोय, असेही चव्हाण यांनी नमूद केले आहे.

Ashok Chavan On Opration Sindoor News
Ministers Convoy: जनतेच्या मनासारखं! CM फडणवीसांसह सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या निम्यावर

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com