Fulambri Assembly Constituency : ...म्हणून फुलंब्री मतदारसंघाला यंदा आहे मंत्रिपदाची आस..!

Anuradha Chavan News : अनुराधा चव्हाण यांनी फुलंब्री मतदार संघात पुन्हा कमळ फुलविले असून काँग्रेसला चारीमुंड्या चित करत चौफेर मतदान घेत महाविकास आघाडीला आगामी निवडणुकांसाठी कडवे आव्हान उभे केले आहे.
Anuradha Chavan
Anuradha ChavanSarkarnama
Published on
Updated on

Fulambri Constituency Vidhansabha Election Result : नुकत्याच संपन्न झालेल्या विधानसभा निवडणुकीत नवनिर्वाचित आमदार अनुराधा चव्हाण यांनी १ लाख ३५ हजार ४६ मताधिक्य मिळवत फुलंब्री विधानसभा मतदारसंघ ताब्यात घेतला आहे. भाजपाचाच बालेकिल्ला असल्याचे सिद्ध केले आहे. आमदार अनुराधा चव्हाण यांनी फुलंब्री मतदार संघात पुन्हा कमळ फुलविले असून काँग्रेसला चारीमुंड्या चित करत चौफेर मतदान घेत महाविकास आघाडीला आगामी निवडणुकांसाठी कडवे आव्हान उभे केले आहे. उद्या मंत्रिमंडळ विस्तार होत असल्याने फुलंब्री विधानसभा मतदारसंघाला मंत्रिपद मिळेल अशी आस येथील जनतेला लागली आहे.

फुलंब्री विधानसभा मतदारसंघातून आमदार अनुराधा चव्हाण(Anuradha Chavan) यांनी 1 लाख 35 हजार 46 मते घेऊन काँग्रेसचे विलास औताडे यांच्यावर 32 हजार 501 मतांनी विजय मिळवीला आहे. यावेळेस जिल्ह्यात सर्वाधिक मताधिक्यात दुसऱ्या स्थानावर आमदार अनुराधा चव्हाण निवडून आल्या आहे.

2024 च्या या आताच्या निवडणुकीत महायुतीतर्फे अनुराधा चव्हाण व महाविकास आघाडीचे(MVA) विलास औताडे यांच्यात सरळ लढत झाली. त्यात अनुराधा चव्हाण यांनी बाजी मारून मागील निवडणुकीतील विजयाची परंपरा कायम ठेवली आहे. फुलंब्री विधानसभा मतदारसंघ भाजपाचाच बालेकिल्ला असल्याचे सिद्ध करून दाखविले आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत फुलंब्री व छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे दहा प्रभाग तसेच दोन्ही तालुक्यातील ग्रामीण भागामधून आमदार अनुराधा चव्हाण यांना मिळालेल्या भरपूर मतांचा लीड पाहता आगामी होणाऱ्या निवडणुकांसाठी ही महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसाठी धोक्याची घंटा तर ठरणार नाही ना? अशा शंका आता उपस्थित होऊ लागल्या आहेत.

Anuradha Chavan
Devendra Fadnavis Banners : ‘मी पुन्हा येईल' ऐवजी आता ‘तो पुन्हा आलाय...'

मतदारसंघाला लाल दिव्याची आस -

आजपर्यंतच्या इतिहासात फुलंब्री विधानसभा मतदारसंघात आताचे राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी एकदा अन्न व नागरी पुरवठा मंत्री तर 2014 मध्ये थेट विधानसभा अध्यक्ष होऊन लाल दिवा मतदारसंघात आणला होता. त्यानंतर आता 2024 च्या विधानसभा निवडणुकीत नवनिर्वाचित आमदार अनुराधा चव्हाण भाजप(BJP)कडून निवडून आल्याने या मतदारसंघाला लाल दिव्याची आस लागली आहे. त्यामुळे चव्हाण यांची वर्णी मंत्रिमंडळात लागावी अशी मागणी मतदारसंघातील नागरिकांकडूनही जोर धरू लागली आहे.

Anuradha Chavan
Pagdi for Oath-taking ceremony : शपथविधी सोहळ्यासाठी अजितदादांसाठी 'गुलाबी' तर मुख्यमंत्र्यांसाठी पुण्याहून जाणार 'ही' विशेष पगडी!

मरगळ झटकून विलास औताडे 'राजकीय आखाड्यात -

फुलंब्री विधानसभेचे पराभूत झालेले काँग्रेसचे उमेदवार विलास औताडे यांनी जनतेने दिलेला कौल मान्य करत ठिकठिकाणी जनतेचे आभार मेळाव्याच्या निमित्ताने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंथन करण्यासाठी महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेतलेली आहे. एकप्रकारे पराभवाच्या शल्यातून बाहेर पडून आगामी निवडणूकांची रणनीती आखण्यावर त्यांचा आता भर असणार आहे. सोबतच पराभवाने खचून न जाता नव्या उमेदीने कामाला लागण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com