Devendra Fadnavis Banners : ‘मी पुन्हा येईल' ऐवजी आता ‘तो पुन्हा आलाय...'

Devendra Fadnavis Hordings in Nagpur : नागपुरात जागोजागी लागले फडणवीसांचे फलक; शपथविधीसाठी शेकडो कार्यकर्ते मुंबईला रवाना!
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Devendra Fadnavis oath taking ceremony : देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदावर भाजपने शिक्कामोर्तब केले आहे. त्यांची भाजपच्या गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. गुरुवारी त्यांचा शपथविधी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. मी पुन्हा येईल ही फडणवीस यांची घोषणा चांगलीच गाजली होती. विरोधकांनी त्यांची खिल्लीसुद्धा उडवली होती. मात्र आता फडणवीस पुन्हा येणार असल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांनी ‘तो पुन्हा आलाय' असे फलक लावून त्यांचे जोरदार स्वागत केले आहे. सोबतच विरोधकांनाही या माध्यमातून टोला लागवला जात आहे.

विधानसभेत सर्वाधिक मोठा पक्ष म्हणून भाजप(BJP) निवडून आला आहे. महायुतीने स्वबळावर सत्ता स्थापन करता येईल एवढे बहुमत मिळवले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री हा भाजपचाच होणार हे आधीच स्पष्ट झाले होते. हाती बहुमत असतानाही दहा दिवस उलटून गेले तरी महायुतीने सत्तास्थापनेसाठी दावा केला नव्हता. त्यामुळे अनेकांची धाकधूक वाढली होती. काळजीवाहू मुख्यमंत्री गावाला निघून गेले होते. ते नाराज असल्याचेही बोलले जात होते.

राज्यातील जातीय समीकरण बघून भाजप मुख्यमंत्रिपदासाठी नवा चेहरा देईल अशीही जोरदार चर्चा होती. त्यामुळे मुख्यमंत्री कोण होणार याविषयी संभ्रम निर्माण झाला होता. मात्र भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने गटनेतेपदी फडणवीस(Devendra Fadnavis) यांची नियुक्ती करून सर्व प्रश्नांना आता पूर्ण विराम दिला आहे. फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार असल्याचे वृत्त धडकताच नागपूरमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी धडाक्यात जल्लोष केला. मिळेल ती गाडी, वाहन पकडून शहरातील भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते शपथविधीसाठी मुंबईकडे रवाना झाले आहेत.

Devendra Fadnavis
Eknath Shinde : पुन्हा मोठा ट्विस्ट ! आता शिंदेंनी फडणवीसांसमोर ठेवली 'ही' नवी अट

दुसरीकडे ‘मी पुन्हा येईल' हे शहरभर लावण्यात आलेले फलक फटाफट बदलण्यात आले. त्याऐवजी ‘तो पुन्हा आलाय' शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी अशी नवे फलक शहरभर लावण्यात आले आहे. भाजपचे मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार प्रवीण दटके, माजी महापौर व फडणवीस यांचे मानद सचिव संदीप जोशी, आमदार परिणय फुके यांनी हे पोस्टर्स लावले आहेत. शहराच्या मोक्याच्या आणि वर्दळीच्या ठिकाणी लावण्यात आलेले हे पोस्टर्स सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.

Devendra Fadnavis
Pagdi for Oath-taking ceremony : शपथविधी सोहळ्यासाठी अजितदादांसाठी 'गुलाबी' तर मुख्यमंत्र्यांसाठी पुण्याहून जाणार 'ही' विशेष पगडी!

तत्पूर्वी भाजपच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष प्रगती पाटील यांच्या नेतृत्वात महिलांनी नागपूरचे जागृत दैवत असलेल्या टेकडी गणेशाला महाआरती केली होती. काहींनी आभिषेक केला होता. या सर्वांची इच्छा टेकडीच्या श्री गणेशाने पूर्ण केली आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com