Ambadas Danve-Kirit Somaiya : सोमय्या संभाजीनगरात गुपचूप येऊन गेले, दानवेंना नोटीस देऊन गेले..

Shivsena UBT : अशा नोटीसीला घाबरणार नाही, मी बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक आहे, जशासतसे उत्तर दिले जाईल.
Kirit Somaiya-Ambadas Danve News
Kirit Somaiya-Ambadas Danve NewsSarkarnama
Published on
Updated on

Marathwada Politics News : भाजपचे वादग्रस्त नेते किरीट सोमय्या दोन दिवसांपूर्वी गुपचूप छत्रपती संभाजीनगरात येऊन गेले. (Ambadas Danve-Kirit Somaiya) एका स्थानिक सीएला भेटण्यासाठी ते आल्याचे सांगितले जाते. पण सोमय्या यांच्या या गुप्त दौऱ्यात आणखी एक महत्त्वाची घटना घडली. ती म्हणजे त्यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना नोटीस पाठवल्याचे समोर आले आहे.

Kirit Somaiya-Ambadas Danve News
Saamana Editorial News : "देवेंद्र फडणवीसांवर झालेल्या अन्यायाला 'सामना'ने वाचा फोडली !"

सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ काही दिवसांपुर्वी व्हायरल झाला होता. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशना दरम्यानच हा व्हिडिओ समोर आल्याने (Kirit Somaiya) किरीट सोमय्या चांगलेच अडचणीत आले होते. (BJP) उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या संदर्भात सभागृहात निवदेन करावे लागले होते. विधान परिषदेत अंबादास दानवे यांनी देखील या आक्षेपार्ह व्हिडिओचा पेनड्राईव्ह उपसभापती डाॅ. नीलम गोऱ्हे यांच्याकडे देत कारवाईची मागणी केली होती.

या प्रकरणीच सोमय्या यांनी अंबादास दानवे यांना अवमान नोटीस पाठवल्याचे बोलले जाते. १८ पानांच्या या नोटिशीत नेमकं काय आहे हे? हे अद्याप समोर आलेले नाही. (Shivsena) विशेष म्हणजे सोमय्या ज्या विमानाने मुंबईतून संभाजीनगरात आले होते, त्या विमानातून दानवे देखील आले होते. यावेळी विमानतळावर समोरासमोर आल्यानंतर सोमय्या यांनी दानवेंना नोटीस पाठवल्याचे सांगितले होते. लवकर तुम्हाला माझी नोटीस मिळेल, असे सोमय्या यांनी सांगितल्याची देखील माहिती आहे.

या संदर्भात दानवे यांनी नोटीस मिळाल्याचे मान्य केले आहे. परंतु या नोटिशीमध्ये नेमकं काय म्हटलं आहे? मजकूर काय आहे हे आपण वाचलेले नाही. या संदर्भात जी काहीही कायदेशीर प्रक्रिया असेल ती आपण करू. अशा नोटीसीला घाबरणार नाही, मी बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक आहे, जशास तसे उत्तर दिले जाईल, असेही दानवे म्हणाले. दरम्यान, सोमय्या गुप्तपणे शहरात येऊन गेले, ते उघडपणे आले असते तर त्यांना पाय तरी ठेवता आला असता का? असा सवालही दानवे यांनी या निमित्ताने केला.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com