

Beed News : गेवराई नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा गीता बाळराजे पवार यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेला अपात्रतेचा अर्ज बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी कायदेशीर तरतुदींचा आधार घेत फेटाळून लावला आहे.
महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, 1965 मधील कलम 44 (1) (ई) आणि कलम 55-अ अंतर्गत ही कारवाई करण्याची मागणी अर्जदार संजय काशिनाथ काळे यांनी केली होती.
अर्जदार काळे यांच्या दाव्यानुसार, गेवराई शहरातील सर्व्हे क्र. 58, 59 व 61 मधील शासकीय व सार्वजनिक जमिनीवर पवार कुटुंबीयांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे त्यांना नगराध्यक्ष पदावरून अपात्र घोषित करावे, अशी मागणी त्यांनी केली होती.
याप्रकरणी जिल्हाधिकारी न्यायालयात फेब्रुवारी ते मे 2026 दरम्यान अनेक सुनावण्या पार पडल्या. मात्र, गैरअर्जदार गीता पवार यांच्यातर्फे ॲड. आर. बी. जाजू यांनी दिवाणी न्यायालयातील प्रलंबित दावे आणि उच्च न्यायालयाच्या विविध निकालांचे दाखले देत हा अर्ज फेटाळण्याची विनंती केली.
थेट निवडून आलेल्या नगराध्यक्षांना कलम 44 अंतर्गत अपात्र ठरवता येत नाही, असे उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने स्पष्ट केलेले आहे. तसेच, कलम 55-अ नुसार कारवाई करण्यासाठी किमान 50 टक्के नगरसेवकांनी स्वाक्षरी केलेले मागणीपत्र जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करणे बंधनकारक असते.
तसेच, नगराध्यक्षांच्या निवडीपासून अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झालेला असणे आवश्यक आहे. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी आपल्या आदेशात स्पष्ट केले की, गीता पवार यांची निवड डिसेंबर 2025 मध्ये झाली असून अद्याप अडीच वर्षांचा कालावधी पूर्ण झालेला नाही.
शिवाय, नगरसेवकांचे मागणीपत्रही प्राप्त झालेले नाही. त्यामुळे वैधानिक अटींची पूर्तता होत नसल्याचे नमूद करत जिल्हाधिकाऱ्यांनी 5 ऑगस्ट 2026 रोजी अर्जदाराचा अर्ज नामंजूर केला. अर्जदार काळे यांचे कोणत्या राजकीय पक्षाशी कनेक्शन आहे? तसेच, कोणाच्या सांगण्यावरून त्यांनी नगराध्यक्षांविरुद्ध तक्रार केली होती का, याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.