Beed Politics : मुंडे बहीण-भावाच्या निवृत्तीच्या संकेतावर करुणा मुंडेंचे मोठे विधान; म्हणाल्या,'बीडमध्ये सभा घेऊन.....'

Beed politics latest News : भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांनी एका कार्यक्रमावेळी बोलताना निवृत्तीबाबत मोठे वक्तव्य केले. यावेळी बोलताना आता राजकारणातून निवृत्त व्हावे असे वाटतंय असे पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या.
karuna munde, dhanjay munde, pankja munde
karuna munde, dhanjay munde, pankja munde Sarkarnama
Published on
Updated on

राज्यातील राजकारण गेल्या काही दिवसापासून फोडाफोडीने व सीजेपी पक्षाने केलेल्या आंदोलनामुळे चांगलेच तापले आहे. त्यातच आता भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांनी एका कार्यक्रमावेळी बोलताना निवृत्तीबाबत मोठे वक्तव्य केले. यावेळी बोलताना आता राजकारणातून निवृत्त व्हावे असे वाटतंय असे पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार धनंजय मुंडे यांनी देखील गलिच्छ राजकारणात राहु शकत नाही असे मोठे विधान केले आहे. दरम्यान, या विधानावरून आता मुंडे बहीण-भाऊ निवृत्तीचे संकेत दिले आहेत का? अशी चर्चा रंगली असतानाच करुणा मुंडे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी या निमित्ताने संधी मिळताच पुन्हा एकदा धनंजय मुंडे, पंकजा मुंडे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

मुंडे बहीण-भाऊ यांनी राजकारणातून निवृत्ती घेण्याचे संकेत दिले आहेत. यावर बोलताना करुणा मुंडे म्हणाल्या की, 'पंकजा मुंडे यांनी सांगितले की मला राजकारणातून एक्झिट पाहिजे आणि धनंजय मुंडे यांनी आज सकाळी सांगितले की या गलिच्छ राजकारणामध्ये मी राहू की नाही. जर हा प्रश्न येतो आहे तर खरोखर या दोघा बहीण-भावांनी राजकारणातून एक्झिट घ्यायला पाहिजे, आणि परळी बीडमध्ये मला संधी द्यायला पाहिजे, मी त्यांच्या एक्झिटसाठी बीडमध्ये सभा घेते, त्यांना पाठिंबा देते.'

या दोघांनी मतदारसंघात गलिच्छ राजकारण केले आहे. त्याचा फटका त्यांना बसण्याची भीती आहे. वंजारी समाजाचा मर्डर झाला की, तुम्ही तिकडे जाता. त्यांच्या कुटुंबाला पाच लाख रुपये देता, परंतु त्यांना देखील पूर्ण न्याय देऊ शकत नाही, असा घणाघात यावेळी करुणा मुंडे यांनी केला. या मंडळीने गलिच्छ राजकारण केले आहे, मुंडे साहेबांचे राजकारण या दोन्ही बहीण-भावांना जमले नाही, असेही करुणा मुंडे म्हणाल्या.

karuna munde, dhanjay munde, pankja munde
BMC Budget : सर्वात श्रीमंत महापालिका, बजेटचा आकडे ऐकूण बसले धक्का; 'ही' राज्य आसपासही नाहीत!

मुंडे साहेबांचे राजकारण या दोन्ही बहीण-भावांना जमले नाही. येत्या काळात मी गोपीनाथ मुंडे साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून काम करणार आहे. मला आता राजकारणात यायला लोकांनी पाठिंबा द्यायला पाहिजे, असेही प्रसार माध्यमाशी बोलताना करुणा मुंडे म्हणाल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com