Girish Mahajan News : पाणीटंचाईच्या भीतीने मंत्री गिरीश महाजन यांनी भरला दम...

Latur News : जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत 323 कोटी रुपयांचा प्रारूप आराखडा तयार
Girish Mahajan
Girish Mahajan Sarkarnama

Marathwada News : जल जीवनच्या कामामुळे टंचाईवर मात केली जाऊ शकते. मात्र, ही कामे करत असताना ती संथ गतीने केला जात असल्याचा आरोप होतो आहे. या कामांना प्राधान्य दिले जात नसल्याचे देखील काही जणांचे म्हणणे आहे. यावर जिल्हा नियोजन समितीच्या ऑनलाईन बैठकीत मंत्री गिरीश महाजन यांनी दम भरत या कामांना प्राधान्य देण्यास सांगितले.

जिल्ह्यात अपुऱ्या पावसामुळे पाणी टंचाईची समस्या निर्माण होवू शकते. त्यामुळे जलजीवन मिशन अंतर्गत सुरु असलेली कामे प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचना राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज, पर्यटन मंत्री तथा लातूरचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिल्या.

Girish Mahajan
Chhatrapati Sambhajinagar : अंबादास दानवे, इम्तियाज जलील अन् हरिभाऊ बागडेंचे 'या' प्रकरणात जुळले सूर...

केंद्र सरकारने जल जीवन मिशन योजना सुरु केली आहे. जिल्ह्यात काही गावांमध्ये या योजनेचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, अद्यापही अनेक गावांमधील कामे अपूर्ण आहेत. आगामी काळात जिल्ह्यात पाणी टंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता असल्याने प्रलंबित कामे तातडीने पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यासाठी संबंधित यंत्रणेने या कामाला प्राधान्य देवून अद्याप सुरु न झालेली कामे लवकरात लवकर सुरु होण्यासाठी ठोस पावले उचलावित. यामध्ये कोणतीही हयगय खपवून घेतली जाणार नाही, असेही महाजन यांनी सांगितले.

जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये स्वच्छता गृहाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आणि अस्तित्वात असलेली स्वच्छता गृहे दुरुस्त करण्यासाठी 5 कोटी 52 लाख रुपयांचा निधी जिल्हा परिषदेला देण्यात आला आहे. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतूनही या कामासाठी निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. त्यामुळे स्वच्छता गृहांचे काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, खासदार सुधाकर शृंगारे, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार विक्रम काळे, सतीश चव्हाण, सुरेश धस, रमेश कराड, अमित देशमुख, संभाजी पाटील निलंगेकर, बाबासाहेब पाटील, धिरज देशमुख, अभिमन्यू पवार या बैठकीला दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

323 कोटींचा प्रारूप आराखडा

जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत सन 2024-25 अंतर्गत 323 कोटी रुपयांचा प्रारूप आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्याला जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. तसेच अनुसूचित जाती उपयोजना अंतर्गत 124 कोटी रुपये आणि अनुसूचित जमाती उपयोजना अंतर्गत 3 कोटी 17 लाख इतकी तरतूद करण्यात आली आहे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे, जिल्हा पोलीस अधिक्षक सोमय मुंढे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य अधिकारी असमल तडवी, जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेडी,नवनियुक्त अशासकीय सदस्य, विविध विभागाचे प्रमुख अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय येथून बैठकीत सहभागी झाले होते.

(Edited By Roshan More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com