Jalgaon Political News : महायुती लोकसभा निवडणुक एकत्र लढणार. महाविकास आघाडीचा पराभव करणार, असे महायुतीतील नेते रोज उठून सांगत आहेत. मात्र, जळगाव जिल्ह्यात भाजप-शिवसेनेत (शिंदे गट) अलबेल नसल्याचे दिसून येत आहे. भाजपचा मंत्री, पदाधिकारी आम्हाला त्रास देतात, अशी तक्रारच शिवसेनेचे पदाधिकरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांच्याकडे करत आहेत.
भारतीय जनता पक्षाचे मंत्री गिरीश महाजन आणि भाजपचे पदाधिकारी यांच्याकडून आम्हाला त्रास दिला जात आहे. याची दखल घेवून तुम्ही मुख्यमंत्री यांच्याकडे त्याची माहिती द्या, अशी तक्रार पाचोरा येथील शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जिल्हा संपर्क प्रमुख सुनील चौधरी यांच्याकडे केली.
जळगाव लोकसभा अंतर्गत तालुक्याची बैठक जळगाव येथे नुकतीच आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी पदाधिकाऱ्यांनी आपली व्यथा मांडली. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील,पाचोरा येथील आमदार किशोर पाटील,जिल्हा संपर्क प्रमुख अंबरनाथ येथील माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी,जिल्हा प्रमुख निलेश पाटील उपस्थीत होते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
आम्हाला विरोधी पक्षाकडून नाही,तर आपला मित्र पक्ष आलेल्या भारतीय जनता पक्षाकडून त्रास दिला जात आहे.भाजपचे नेते व मंत्री गिरीश महाजन हे आम्हाला त्रास देतात,त्यांचे पाचोरा येथील पदाधिकारी आमच्या प्रत्येक कामात व्यत्यय आणतात अशी तक्रार पाचोरा येथील पदाधिकाऱ्याने केली.
पाचोरा बाजार समितीचे सभापती गणेश पाटील यांनीही भाजप चे मंत्री व पदाधिकारी यांच्याकडून होत असलेल्या त्रासाची कैफियत मांडली.आमची ही तक्रार तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री व पक्षाचे नेते एकनाथ शिंदे यांच्या कडे मांडवी असेही या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
भाजपबाबत कार्यकर्त्यांनी लहान मोठ्या तक्रारी केल्या आहेत. त्याची आम्ही दखल घेवून त्या मित्र पक्षाच्या नेत्यांशी बोलून सोडवून घेवू, असे जिल्हा संपर्क प्रमुख सुनील चौधरी यांनी सांगितले.
(Edited By Roshan More)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.