Vanchit Bahujan Aghadi: नगरसेवकांचे गोव्यातील व्हिडिओ समोर, 'वंचित'चा उमेदवार संतापला; 'नांदेड'ची निवडणूकच रद्द करण्याची आयोगाकडे मागणी

Nanded MLC Election: नांदेड विधान परिषदेत लोकशाही मातीत गाडण्याचे काम सुरू आहे, नगरसेवकांना सहलीवर पाठवून, त्यांना पैसे देऊन मत विकत घेतली जात आहेत. प्रतिस्पर्धी दोन्ही उमेदवार हे प्रस्थापित आहेत, सहलीचा, हाॅटेलचा खर्च कोण करतं? याची सीआयडी चौकशी केली तर सगळं समोर येईल.
Prakash Ambedkar
Prakash AmbedkarSarkarnama
Published on
Updated on

Nanded MLC Election 2026 : मी नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचा उमेदवार आहे, पण मला प्रचार करायला मतदारच सापडत नाहीत. अनेक नगरसेवक गायब आहेत, ते कुठे गेलेत? हे त्यांच्या कुटुंबालाही माहिती नाही. त्यांचे फोन बंद येत आहेत, त्यांना कोणी किडनॅप केले का? त्यांचा काही घातपात झाला का? असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रशांत इंगोले यांनी निवडणुक निरीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती.

दरम्यान, कालपासून समाज माध्यमांवर देगलूर येथील भाजप व इतर काही पक्षाच्या नगरसेवकांचा गोव्यात धम्माल करतांनाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून वंचितचे उमेदवार प्रशांत इंगोले चांगलेच संतापले.

नांदेड विधान परिषदेत लोकशाही मातीत गाडण्याचे काम सुरू आहे, नगरसेवकांना सहलीवर पाठवून, त्यांना पैसे देऊन मत विकत घेतली जात आहेत. प्रतिस्पर्धी दोन्ही उमेदवार हे प्रस्थापित आहेत, सहलीचा, हाॅटेलचा खर्च कोण करतं? याची सीआयडी चौकशी केली तर सगळं समोर येईल. अशा पद्धतीने निवडणूक होणार असले तर त्याला काही अर्थ नाही. विधान परिषदेची ही निवडणूक रद्दच करा, अशी मागणी इंगोले यांनी निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रात केली आहे.

प्रशांत इंगोले यांनी 12 जून रोजी निवडणूक निरीक्षक माधवी खोडे यांची भेट घेऊन मतदारांचा शोध घ्या, ते गायब आहेत, त्यांचे सीडीआर चेक करा अशी मागणी केली होती. त्यानंतर आज देगलूर येथील भाजप नगरसेवकांचा गोव्यातील व्हिडिओ समोर आल्यानंतर पुन्हा वंचितचे उमेदवार इंगोले यांनी निवडणूक निरीक्षकांची भेट घेत ही निवडणूकच रद्द करा, अशी मागणी करणारे निवडणूक आयोगाला पाठवण्याचे पत्र दिले. यापुर्वी इंगोली यांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षकांना निवेदन देऊन, नांदेड जिल्ह्यातून गायब झालेल्या नगरसेवकांना शोधून परत आणा, अशी मागणी केली होती.

Prakash Ambedkar
IAS Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंची कारवाई पहिल्यांदाच संशयाच्या भोवऱ्यात : 'ऐतिहासिक ब्रँड' संपवायला मंत्री अन् जिल्हाधिकाऱ्यांचीही छुपी साथ?

विधान परिषदेसाठी 18 जून रोजी प्रत्यक्ष मतदान होणार आहे. परंतु प्रस्थापित उमेदवारांनी सर्व नगरसेवकांना सहलीवर पाठवल्यामुळे त्यांचे फोन बंद होते. त्यामुळे मला प्रचार करता आला नाही. कुठल्याही मतदाराला पैशाचे आमिष दाखवणे, त्यांना सहलीवर पाठवणे हा निवडणूक आचारसंहितेचा भंग आहे.

मात्र, जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक, निवडणूक निरीक्षक आमच्या तक्रारीची दखल घेत नाही. पावसाळ्याचे दिवस आहेत, देगलूरमध्ये नाल्या साफ झालेल्या नाहीत, मोठा पाऊस झाला तर शहरात, तालुक्यात पूर येईल अशी परिस्थिती आहे. अशावेळी जनतेने निवडून दिलेल्या नगरसेवकांनी आपापल्या प्रभाागांमध्ये राहून जनतेची काळजी घेणे आवश्यक आहे.

Prakash Ambedkar
Congress MP : अमोल कोल्हेंनंतर आणखी एका नेत्याला खासदार झाल्याने होतोय 'लॉस' : डॉक्टरकीचा बिझनेस थांबल्याने आर्थिक फटका

वंचितचे प्रशांत इंगोले म्हणाले,भाजपचे हे नगरसेवक चक्क गोव्यात मौजमजा करत आहेत. लोकशाहीमध्ये निवडणूका पारदर्शक आणि आचारसंहितेचे पालन करत होणे अपेक्षित आहे. मात्र, इथे लोकशाही मातीत गाडण्याचे काम सुरू आहे, याचा पुनरुच्चार करत इंगोले यांनी विधान परिषदेची निवडणूक रद्द करण्याची किंवा ती नव्याने घेण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com