Congress MP : अमोल कोल्हेंनंतर आणखी एका नेत्याला खासदार झाल्याने होतोय 'लॉस' : डॉक्टरकीचा बिझनेस थांबल्याने आर्थिक फटका

Shivajirao Kalge, Latur MP, Medical Practice Loss: लातूरचे खासदार डॉ. शिवाजीराव काळगे यांनी खासदार झाल्यानंतर वैद्यकीय व्यवसायावर परिणाम झाल्याचे सांगितले. रुग्णांना वेळ देता न आल्याने उत्पन्न घटले असून आर्थिक फटका बसल्याची त्यांनी कबुली दिली.
MP Shivaji Kalge
MP Shivaji KalgeSarkarnama
Published on
Updated on

MP Shivajirao Kalge : राजकारणात येण्याची, आमदार, खासदार होण्याची अनेकांची इच्छा असते. समाजसेवा करायची म्हणून वैद्यकीय, शैक्षणिक, उद्योग, क्रिडा, चित्रपटसृष्टी अशा किती तरी क्षेत्रातील नावाजलेले चेहरे आज राजकारणात आहेत. अगदी सरकारी नोकरी सोडून राजकारणात आलेल्यांची अनेक उदाहरणं आहेत. 2024 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने उच्चशिक्षित नेत्ररोग तज्ञ असलेल्या डाॅ. शिवाजी काळगे यांना उमेदवारी दिली. भाजपाच्या मातब्बर अशा सुधाकर शृंगारे यांचा पराभव करून काळगे निवडून आले. काँग्रेसचे नेते, आमदार अमित देशमुख यांची खेळी यशस्वी ठरली याबद्दल तेव्हा मोठे कौतुकही झाले.

आता तेच खासदार शिवाजी काळगे आपला राजकारणात येऊन आर्थिक लाॅस झाला, अशी खंत व्यक्त करत आहेत. लातूर येथील एका स्थानिक वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत आपला वैद्यकीय व्यवसाय कसा ठप्प झाला हे काळगे यांनी त्यांच्या घटलेल्या इनकम टॅक्सचे उदाहरण देत सांगितले. काही वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनीही अशाच प्रकारची खंत व्यक्त करत अगदी खासदारकीचा राजीनामा देण्याचीही तयारी दर्शवली होती.

डॉ. शिवाजी काळगे हे २०२४ मध्ये लातूर या राखीव लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस-महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून निवडून आले. भाजपचे विद्यमान खासदार सुधाकर श्रुंगारे यांचा त्यांनी पराभव केला होता. काँग्रेसचे नेते अमित देशमुख यांनी जातीय समीकरण जुळवून आणत टाकलेला डाव काळगे यांच्या विजयामुळे यशस्वी ठरला.

MP Shivaji Kalge
Maharashtra Politics Live Update : मोहोळचे आमदार राजू खरे यांचा महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतराव देशमुख यांना पाठिंबा

डॉ. शिवाजी बंडाप्पा काळगे यांचे मुळगाव निलंगा तालुक्यातील राणी अंकुलगा हे आहे. अनुसूचित जाती - माला जंगम समाजाचे असलेले शिवाजी काळगे लातूर राखीव मतदारसंघातून लोकसभेच्या उमेदवारीसाठी तीन टर्मपासून प्रयत्नशील होते असे बोलले जाते. राजकारणाची ओढ असलेल्या काळगे यांचा वैद्यकीय व्यवसायात चांगला जम बसला होता. लक्ष्मी नेत्रालय आणि मॅटरनिटी होमच्या माध्यमातून ते लातूरकरांना वैद्यकीय सेवा देत आहेत. त्यांच्या पत्नी डाॅ. सविता काळगे या स्त्री रोग तज्ञ आहेत. दोघेही लातूरमध्ये वैद्यकीय सेवा देतात.

काळगे यांचे प्राथमिक शिक्षण निलंगा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतून तर वैद्यकीय शिक्षण एमबीबीएस, डीओएमएस, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे पूर्ण झाले आहे. त्यांनी Diploma in Ophthalmology and Master of Surgery मध्ये पूर्ण केलेला आहे. नेत्ररोग तज्ञ असलेले शिवाजी काळगे हे राजकारणात येण्यापुर्वी नेत्रशल्यचिकित्सक म्हणून पूर्णवेळ कार्यरत होते. २७ वर्षापासून या क्षेत्रात सेवा देत असताना लातूर लोकसभेतील उमेदवारी आणि विजयाने त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली.

MP Shivaji Kalge
Beed: कोट्यावधींच्या वाळूवर डल्ला मारणारा बीड जिल्ह्यातील तहसीलदार अडचणीत; जिल्हाधिकाऱ्यांनी आवळला कारवाईचा फास

रुग्णांना वेळ देता येत नाही..

खासदार डाॅ. शिवाजी काळगे यांनी एका मुलाखतीत बोलताना राजकारणात आल्यामुळे आपला आर्थिक लाॅस झाल्याची कबुली दिली. २०२३-२४ या आर्थिक वर्षात आपण वैद्यकीय व्यवसायापोटी ३६ लाख रुपये इनकम टॅक्स भरला होता. तोच राजकारणात आणि खासदार झाल्यानंतर २४-२५ मध्ये केवळ पावणे नऊ लाख रुपये आपण इनकम टॅक्स भरला आहे. इनकमच राहिले नाही, मी रुग्णांना वेळ देऊ शकत नाही, फुल टाईम हाॅस्पिटल चालवू शकत नाही, ही यामागची कारणे आहेत. आर्थिक दृष्ट्या जर कोणी मला विचारले, तर मी म्हणेन खासदारकीमध्ये माझा लाॅसच आहे, असेही खासदार शिवाजी काळगे यांनी सांगीतले.

अमोल कोल्हेंनी दाखवली होती राजीनाम्याची तयारी :

शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी २०१९ मधील विजयानंतर सुरुवातीच्या काळातच आर्थिक अडचणींमुळे खासदारकीचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली होती, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला होता. "मी एक कलावंत असून माझ्या कामावर आणि सिनेमावर परिणाम होत आहे. मी काढलेला शिवाजी महाराजांवरील एक सिनेमा अजिबात चालला नाही. माझ्या आर्थिक गोष्टींवर याचा परिणाम होत आहे", असे कोल्हे म्हणाले असल्याचे अजित पवार यांनी सांगितले होते.

यावर कोल्हे यांनी स्पष्टीकरण देत, राजकीय पेचप्रसंगाच्या काळात राजीनामा देण्याचा विचार केला असला तरी शरद पवारांच्या सल्ल्यामुळे तो मागे घेतल्याचे सांगितले होते. "शरद पवार यांनी राजीनामा न देण्याचा सल्ला दिला आणि मतदारसंघाच्या विकासावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले. पवारांनी मार्गदर्शन केल्यामुळे त्यांनी राजीनामा देण्याचा विचार बदलला आणि खासदारकी कायम ठेवली", असे कोल्हे यांनी स्पष्ट केले होते. आता अशीच काहीशी आर्थिक अडचण लातूरचे काँग्रेसचे खासदार डॉ. शिवाजीराव काळगे यांनीही बोलून दाखवली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com