Sanjay Shirsat On Sanjay Raut : राऊत जनतेतून निवडणूक लढवणार याचा आनंदच ; आता त्यांना औकात कळेल..

Shivsena News : निवडून यायचे तर सोडाच, पण त्यांचे डिपाॅझीट जप्त झाले नाही, तरी मिळवले.
Sanjay Raut, Sanjay Shirsat
Sanjay Raut, Sanjay ShirsatSarkarnama

Aurangabad Political News : ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत हे ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडूक लढवणार असल्याच्या चर्चा काही दिवसांपासून सुरू आहेत. राऊत यांनीदेखील याला दुजोरा देत उद्धव ठाकरेंनी आदेश दिला तर आपण लढायला तयार आहोत, असे स्पष्ट केले आहे. (Shirsat-Raut News) यावर शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.

Sanjay Raut, Sanjay Shirsat
Ambadas Danve On Onion Issue: निर्यात शुल्कवाढीचा निर्णय कांदा उत्पादकांना देशोधडीला लावणारा..

संजय राऊत (Sanjay Raut) ईशान्य मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवणार असतील तर याचा आम्हाला आनंदच आहे. इतकी दिवस आमच्या मतांवर खासदार झालेल्या संजय राऊत यांना आता त्यांची खरी औकात कळेल, असा टोला शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी लगावला. सातत्याने आमच्यावर टीका करणे, माध्यमांना प्रतिक्रिया देणे किंवा टेबल न्यूज करण्याइतके जनतेत जाऊन निवडणूक लढवणे सोपे नसते, हे राऊत यांना आता कळेल, असेही शिरसाट म्हणाले.

शिंदे गटाने केलेले बंड आणि त्यानंतर राज्यात झालेले सत्तांतर तेव्हापासून संजय राऊत चाळीस आमदारांवर तुटून पडले आहेत. (Shivsena) सामनातील अग्रलेख, माध्यमांवरील प्रतिक्रिया यातून राऊत सातत्याने शिंदे गटाचा समाचार घेतांना दिसत आहेत. राऊत यांनी केलेली टीका, आरोप शिंदे गटाच्या जिव्हारी लागत असल्याचे देखील अनेकदा त्यांच्याकडून उमटलेल्या प्रतिक्रियांवरून दिसून आले आहे.

त्यामुळे शिंदे गटामध्ये राऊत यांच्याविरोधात कमालीचा रोष आहे. आमच्या मतांवर दोनवेळा खासदार झालेले राऊत आम्हालाच शिकवतात, अशी भावना शिंदे गट आणि त्यांच्या आमदार, मंत्र्यांची झाली आहे. आता राऊत ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार म्हटल्यावर शिरसाट यांनी त्यांच्यावर टीकेची संधी हेरली. शिरसाट म्हणाले, जनतेतून निवडून येणे एवढे सोपे नसते. लोकांची काम करावी लागतात, त्यांच्या सुखदुःखात धावून जावे लागते, हात जोडावे लागतात. पण आमच्या मतांवर निवडून आलेल्या संजय राऊत यांना हे काय कळणार?

आता ते जनतेतून निवडणूक लढवणार असे समजते, याचा आम्हाला खरंच आनंद झाला. त्यांनी जनतेतून निवडणूक लढवावीच, म्हणजे त्यांना आपली औकात काय आहे? हे कळेल. निवडून यायचे तर सोडाच, पण त्यांचे डिपाॅझीट जप्त झाले नाही, तरी मिळवले, असा टोला देखील शिरसाट यांनी लगावला. खासदार विनायक राऊत यांनी भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना इंडिया फ्रंटमध्ये आल्यास पंतप्रधान करू या विधानाचीही आपली लायकी काय? आपण बोलतो काय? अशा शब्दात शिरसाट यांनी खिल्ली उडवली.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com