Harshvardhan Jadhav: 'फडणवीस सरकार दिवाळखोर' म्हणणाऱ्या माजी आमदाराला विधीमंडळ परिसरात बोलण्यास मज्जाव!

Harshvardhan Jadhav in Assembly Winter Seession: महाराष्ट्र सरकारच्या बजेटची फाईल आपल्या हाती असल्याचा दावा करत ते बोलणार तेवढ्यात एका पोलीस कर्मचाऱ्याने त्यांना रोखले. आपण माजी विधानसभा सदस्य असल्यामुळे या ठिकाणी उभे राहून माध्यमांना बोलता येणार नाही,असे सांगण्यात आले.
Harshvardhan Jadhav
Harshvardhan Jadhavsarkarnama
Published on
Updated on

Assembly Winter Seession News : माजी आमदार हर्षवर्धन जाधव सध्या नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात विधिमंडळ परिसरात फिरताना दिसत आहे. हातात फाईल, काही सरकारी अहवाल घेत महाराष्ट्र सरकार कसे दिवाळखोरीत निघाले आहे? हे राज्यभरातून आलेल्या माध्यमांना सांगण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. मुंबईत झालेल्या अधिवेशनातही त्यांनी सरकारच्या जमिनी धनदांडग्यांनी कशा हडपल्या आहेत? किंवा त्या कशा नाममात्र दरात? वर्षानुवर्षे ते वापर आहेत हा मुद्दा उपस्थित करत सरकारला धारेवर धरले होते.

नागपूर विधिमंडळ परिसरात काल सत्ताधारी मंत्री, आमदार किंवा विरोधी पक्षाचे नेते माध्यमांना बाईट देतात त्यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधीजवळ जाऊन महाराष्ट्र कसा दिवाळखोरीत निघाला आहे? याबद्दल सविस्तर ब्रीफ करण्याच्या तयारीत होते. महाराष्ट्र सरकारच्या बजेटची फाईल आपल्या हाती असल्याचा दावा करत ते बोलणार तेवढ्यात तिथे बंदोबस्तावर असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने त्यांना रोखले. आपण माजी विधानसभा सदस्य असल्यामुळे आपल्याला विद्यमान आमदार, मंत्री बाईट देतात, त्या ठिकाणी उभे राहून माध्यमांना बोलता येणार नाही,असे सांगण्यात आले.

नियमानूसार आपणास इथे बोलण्यास परवानगी नाही, हे संबंधित पोलीस कर्मचाऱ्याने हर्षवर्धन जाधव यांच्या निदर्शनास आणून दिले. यावर वाद न घालता जाधव यांनी माध्यमांना मी माजी विधानसभा सदस्य असल्याने मला इथे बाईट देण्यास परवानगी देण्यात आलेली नाही, असे स्पष्ट करत मला महाराष्ट्र कसा दिवाळखोर झाला आहे? हे आपल्याला सांगायचे होते. माझ्या हातात राज्याचे बजेट बुक आहे. कोणी इंटरेस्टेड असेल तर तिकडे बाजूला माझा बाईट घेऊ शकता, असे सांगितले.

Harshvardhan Jadhav
Rahul Narwekar: नाना पटोलेंचा आग्रह कायम! नार्वेकरांनी नियमावलीच वाचली! विधीमंडळात काय घडलं?

मुंबईत झालेल्या अधिवेशनातही हर्षवर्धन जाधव यांनी सरकारच्या कारभारावर टीका करत राज्यातील मोठ्या सेलिब्रेटी, उद्योगपतींनी सरकारी जांगावर नाममात्र कराराच्या आधारे बांधलेल्या बंगल्याचा विषय काढत सरकारचे कोट्यावधीचे नुकसान होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. सरकारने या सगळ्या जागा जरी ताब्यात घेतल्या तरी राज्याच्या डोक्यावर असलेले कर्ज फिटू शकते असा मुद्दा मांडला होता. याची तेव्हा राज्यभरात चर्चाही झाली.

आता नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्र सरकार दिवाळखोर झाल्याचा मुद्दा हर्षवर्धन जाधव मांडू इच्छित होते.सोशल मिडियाच्या माध्यमातून ते सातत्याने राज्यातील महायुती सरकार आणि केंद्रातील मोदी सरकारवर टीका करतांना दिसतात. सरकारविरोधी भूमिका घेत विधीमंडळ परिसरातच टीका आणि दिवाळखोरीचा आरोप करणाऱ्या हर्षवर्धन जाधव यांना यावेळी मात्र पोलीसांनी रोखत बोलण्यास मज्जाव केल्याचे दिसून आले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com