

BRS News : गेल्या लोकसभा निवडणुकीत माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी पावणे तीन लाखांहून अधिक मते घेत छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाचा निकाल फिरवला होता. (Harshvardhan Jadhav News) आता पुन्हा एकदा जाधव बीआरएस पक्षाकडून लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छूक आहेत की काय? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.
हर्षवर्धन जाधव (Harshvardhan Jadhav) यांनी आज आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधत बीआरएसचे संपर्क कार्यालयाय सुरू केले. या कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच भावी खासदार असा उल्लेख असलेले जाधव यांचे भलेमोठे बॅनर सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होते. त्यामुळे जाधव यांची पुन्हा लोकसभेच्या (Aurangabad) मैदानात उडी घेण्याची तयारी दिसते. आता त्यांना २०१९ च्या निवडणुकीत मिळाली इतके मते पुन्हा मिळवता येतात ? की मग त्यांचा ग्राफ खाली येतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
जाधव यांनी लोकसभा लढवली आणि त्यात यश आले नाही, तर ते पुन्हा बीआरएसकडून कन्नड-सोयगांव विधानसभा लढवू शकतात. (Marathwada) हर्षवर्धन जाधव यांनी आज अदालत रोड येथील आपल्या स्वतःच्या जागेत बीआरएसचे कार्यालय सुरू केले. बीआरएस पक्षात प्रवेश केल्यापासून जाधव यांचा उत्साह पाहण्यासारखा आहे.
विशेषत: शेतकऱ्यांच्या कांदा प्रश्नावर त्यांनी घेतलेली भूमिका आणि मतदारसंघातील शेतकऱ्यांचा कांदा थेट तेलंगणात नेवून विकला. शेतकऱ्यांच्या कवडीमोल कांद्याला चांगला भाव मिळवून दिल्याचा दावा त्यांच्याकडून केला जातोय. मतदारसंघात बीआरएस पक्षाच्या सदस्य मोहिमेला देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे कदाचित गेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल आणि त्यात जाधव यांनी मिळवलेली विक्रमी मते पाहता बीआरएसकडून त्यांना उमेदवारी मिळेल अशी चर्चा आहे.
`अब की बार किसान सरकार`, चा नारा देत महाराष्ट्रात विशेषतः मराठवाड्यात भारत राष्ट्र समिती अर्थात बीआरएसने काम सुरू केले आहे. काही दिवसांपुर्वी स्वतः तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे नांदेड किंवा छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होती. त्यात आता हर्षवर्धन जाधव यांच्या नावाची देखील भर पडली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.