Maratha Reservation News : ट्रोल होताच हर्षवर्धन जाधव म्हणाले, जरांगेंना विरोध नाही..

Harshvardhan Jadhav News : राज्य सरकारने ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही अशी भूमिका घेतली आहे.
Maratha Reservation News
Maratha Reservation NewsSarkarnama
Published on
Updated on

Marathwada Political News : मराठा आरक्षणासाठी राज्यभरात लढा उभा केलेल्या मनोज जरांगे यांचा मार्ग चुकतो आहे. सरसकट मराठ्यांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र आणि त्याआधारे ओबीसीतून आरक्षण हे न्यायालयात टिकणार नाही. (Maratha Reservation) या ऐवजी त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे संसदेत मराठा आरक्षणाचे विधेयक पास करून घेण्याची मागणी करावी. हे मी त्यांना पहिल्या भेटीतच सांगितले होते.

Maratha Reservation News
Manoj Jarange Rally News : जरांगेंचे बंद फेसबुक अकाउंट चोवीस तासांत सुरू...

राजकारणात एखाद्या व्यक्तीची शिकार होणार असेल तर त्याला वेळीच सावध करावे, हाच माझा प्रयत्न आहे. (Marathwada) मनोज जरांगे यांना माझा विरोध नाही, पण ते चुकीच्या मार्गाने जात आहे, यावर मी ठाम असल्याचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव (Harshvardhan Jadhav) यांनी स्पष्ट केले. अंतरवाली सराटी येथे काल झालेल्या मनोज जरांगे यांच्या सभेनंतर हर्षवर्धन जाधव यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मराठा आरक्षण आणि जरांगे यांनी घेतलेली भूमिका यावर आपले मत व्यक्त केले.

त्यानंतर समाज माध्यमांवर जाधव यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले. यावर हर्षवर्धन जाधव यांनी पुन्हा आपली भूमिका स्पष्ट केली. (Maratha Reservation) मला ट्रोल करून काहीही उपयोग होणार नाही. मराठा समाजाला टिकणारे आरक्षण मिळावे, देवेंद्र फडणीस यांनी दिलेल्या आरक्षणाची गत जशी झाली तशी पुन्हा होऊ नये. यातून मराठा समाजाच्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

फडणवीसांनी दिलेले एसीबीसीचे आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने उडवून लावले. तसाच प्रकार जरांगे पाटील करत असलेल्या आरक्षणाच्या बाबतीत घडू शकतो. राज्य सरकारने ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही अशी भूमिका घेतली आहे. मग सध्या सुरू असलेला प्रकार काय म्हणावा ? जरांगे पाटील यांना मी विरोध का करावा, त्याचे काहीही कारण नाही.

परंतु मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र देऊन ओबीसीतील आरक्षण मिळाल्याने समाजाचा हेतू साध्य होणार नाही. हेच सांगण्याचा माझा प्रयत्न होता मला कुठल्याही प्रकारे हिरो व्हायचे नाही किंवा श्रेयही घ्यायचे नाही. त्यामुळे कितीही ट्रोल केले तरी मी माझी भूमिका मांडतच राहणार, असेही जाधव यांनी स्पष्ट केले.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com