MLA Hemant Patil : हेमंत पाटील यांच्यावर उपमुख्यमंत्री शिंदे मेहरबान, विधान परिषदेच्या गटनेतेपदी केली नियुक्ती!

Hemant Patil Appointed as Legislative Council Leader : हेमंत पाटील यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपच्या दबावामुळे ती रद्द करून बाबुराव कदम यांना तिकीट द्यावे लागले होते.
Eknath Shinde- Hemant Patil
Eknath Shinde- Hemant PatilSarkarnama
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दिलेला शब्द पाळणारा नेता अशी महाराष्ट्राला ओळख झाली आहे. लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या, ऐनवेळी उमेदवारी कापलेल्या व जाहीर झालेली उमेदवारी बदललेल्या अनेकांचे राजकीय पुनर्वसन एकनाथ शिंदे यांनी केले. यात माजी खासदार कृपाल तुमाने, भावना गवळी, हेमंत पाटील यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल.

लोकसभा निवडणुकीच्या वेळी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना अनेक तडजोडी कराव्या लागल्या होत्या. काही विद्यमान खासदारांची तिकीटंही त्यांना कापावी लागली. पण या निर्णयाचा फटका महायुती किंवा शिवसेनेला बसू नये याची काळजी देखील तेव्हा मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांना वाहिली होती. वाशिमच्या भावना गवळी, हिंगोलीचे हेमंत पाटील या विद्यमान खासदारांची उमेदवारी शिंदे यांना कापावी लागली होती.

Eknath Shinde- Hemant Patil
Eknath Shinde Video : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार दिल्लीत; एकनाथ शिंदे का नाही गेले? विश्वासू नेत्याने सांगितली आतली बातमी

हेमंत पाटील यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपच्या दबावामुळे ती रद्द करून बाबुराव कदम यांना तिकीट द्यावे लागले होते. या सगळ्या परिस्थितीत (Hemant Patil) हेमंत पाटील यांना शिंदे यांनी 'तुमचे नुकसान होऊ देणार नाही, राजकीय पुनर्वसन योग्यरित्या केले जाईल', असा शब्द दिला होता. विशेष म्हणजे हा शब्द शिंदे यांनी पाळला देखील. कृपाल तुमाने, भावना गवळी यांना विधान परिषदेवर संधी देण्यात आली.

Eknath Shinde- Hemant Patil
Hemant Patil: लोकसभेला तिकीट मिळनूही ऐनवेळी माघार...; हेमंत पाटलांना अखेर आमदारकीची 'हळद' लागलीच!

तेव्हा हेमंत पाटलांचे काय? असा प्रश्न त्यांच्या समर्थकांनी केला होता. पाटील यांच्या मनाचीही घालमेल तेव्हा सुरू होती, पण त्यांचा शिंदेवर पुर्ण विश्वास होता. तुमाने, गवळी यांच्या राजकीय पुनर्वसनानंतर शिंदेंनी सर्वप्रथम हेमंत पाटील यांची हिंगोली येथील हळद संशोधन केंद्राच्या अध्यक्षपदी निवड केली. मंत्रीपदाचा दर्जा असलेले हे पद दिल्यानंतर हेच हेमंत पाटील यांचे पुनर्वसन असे सगळ्यांना वाटले.

Eknath Shinde- Hemant Patil
MNS Vs Shivsena UBT : "बारामतीच्या हातच्या खुळखुळ्याने उगीच..." राज ठाकरेंवरील 'ती' टीका मनसेच्या जिव्हारी, राऊतांना दिलं जोरदार प्रत्युत्तर

परंतु विधान परिषदेच्या निवडणुकीत शिंदे यांनी शिवसेनेच्या कोट्यातून हेमंत पाटील यांना संधी दिली आणि खऱ्या अर्थाने त्यांचे पुनर्वसन झाले. पण शिंदेंचे हे पाटील प्रेम एवढ्यावर थांबले नाही. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला घवघवीत यश मिळाले. शिंदेंच्या नेतृत्वाखाली एकट्या शिवसेनेचे 57 आमदार निवडून आले.

Eknath Shinde- Hemant Patil
Eknath Shinde: आठवलेंच्या खास शैलीत शिंदेंची सभागृहात तुफान टोलेबाजी; पटोलेंना चिमटा VIDEO पाहा

नव्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री पद स्वीकारावे लागले. ते नाराज आहेत अशा चर्चांही होऊ लागल्या. पण अशाही परिस्थितीत एकनाथ शिंदे यांनी विधानसभेतील शिवसेनेच्या मुख्य प्रतोद पदी वैजापूरचे आमदार प्रा. रमेश बोरनारे यांची आणि आता विधान परिषदेच्या शिवसेना गटनेतेपदी आमदार हेमंत पाटील यांची नियुक्ती केली. हेमंत पाटील यांच्यावर शिंदे यांची विशेष मेहरबानी असल्याची चर्चा या निमित्ताने होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com