Eknath Shinde: आठवलेंच्या खास शैलीत शिंदेंची सभागृहात तुफान टोलेबाजी; पटोलेंना चिमटा VIDEO पाहा

Rahul Narvekar Speaker of the Maharashtra legislative assembly: 'कर नाही,त्याला नाही डर...उसका नाम राहुल नार्वेकर...'असं म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला. फडणवीस, अजित पवार, पटोले यांच्यासह उपस्थितांना हसू आवरता आले नाही.
cm eknath shinde speech
cm eknath shinde speech Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: विधानसभेच्या विशेष अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शेरो-शायरीनं गाजला. भाजपचे आमदार राहुल नार्वेकर यांची दुसऱ्यांदा विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली. सर्वच पक्षाच्या नेत्यांनी नार्वेकरांचे अभिनंदन केले. यावेळी शिंदेंनी तुफान फटकेबाजी केली. यानिमित्ताने केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या कवितांची आठवण झाली.

'कर नाही,त्याला नाही डर...उसका नाम नार्वेकर...'

एकनाथ शिंदे यांनी 'कर नाही,त्याला नाही डर...उसका नाम राहुल नार्वेकर...'असं म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, नाना पटोले, जयंत पाटील, सुधीर मुनगंटीवार यांच्यासह उपस्थित सर्व सदस्यांना हसू आवरता आले नाही. या कवितेनंतर "रामदास आठवले आणि माझी आता युती झाली," असं मिश्किलपणे शिंदे म्हणाले त्यानंतर सभागृहात हास्यांचे फवारे उडाले.

cm eknath shinde speech
Local Body Election : महाराष्ट्रात विकासाची चाके थांबली! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर

त्यांचं आमचं प्रेम आहे...

राहुल नार्वेकर यांचे अभिनंदन करताना एकनाथ शिंदे यांनी सभागृहाला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या राजीनाम्याची आठवण करून दिली. शिंदे म्हणाले, नाना पटोलेंचे आभार मानतो. तुम्ही नार्वेकरांसाठी अध्यक्षपद रिक्त केले आणि तिथून गाडी सुरू झाली. याचं सगळं क्रेडिट तुम्हालाच आहे. त्यामुळे नाना आमचे खरे मित्र आहेत. मीडियासमोर काय बोलत असतील, ते जाऊदा. पण त्यांचं आमचं प्रेम आहे," असे म्हणत त्यांना चिमटा काढला.

cm eknath shinde speech
Rahul Narvekar: बाळासाहेब भारदे यांच्यानंतर दुसऱ्यांदा विधानसभेचे अध्यक्ष होणारे राहुल नार्वेकर कोण?

‘ना ना करते प्यार तुम्हीसे कर बैठे'

शिंदे पटोलेंवर हे बोलत असतानाच शेजारी बसलेले मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘ना ना करते प्यार तुम्हीसे कर बैठे’, या हिंदी गीताची आठवण करून दिली. शिंदेंनीही या ओळी म्हणत नाना पटोलेंना टोला लगावला. आम्ही मुळ विसरत नाही, असे सांगत शिंदेंनी पटोलेंना मागील अडीच वर्षांतील सर्व राजकीय घटनाक्रमाचे क्रेडिट दिले. यावेळी समोर बसलेले नाना पटोलेंनाही हसू आवरता आले नाही.

आपण परत आलात

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या 'मी पुन्हा येईल' या आपल्या लोकप्रिय संवादाची आठवण करुन दिली. "खरं म्हणजे अध्यक्ष महोदयांनी मी पुन्हा येईन म्हटलं नव्हतं, पण तरीही आपण परत आलात याचा मला मनापासून आनंद आहे, असे फडणवीस म्हणाले. देवेंद्र फडणवीसांच्या या विधानानंतर सभागृहात एकच हशा पिकला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com