High Court News : ग्रामविकास मंत्र्यांचा सरपंच, उपसरपंचांना अपात्र ठरवण्याचा निर्णय खंडपीठात रद्द!

Girish Mahajan News : ग्रामविकास मंत्री महाजन यांचे आदेश याचिकाकर्त्यांवर अन्याय करणारे असल्याचा युक्तीवाद ॲड. कवडे यांनी केला होता.
Girish Mahajan and High Court
Girish Mahajan and High CourtSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar News : राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांना अपात्र ठरविले होते. त्यांच्या निर्णयास मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान देण्यात आले होते.

सुनावणीनंतर न्या. एस. जी. मेहरे यांनी ग्रामविकास मंत्री महाजन(Girish Mahajan) यांचे आदेश रद्दबातल केले. लोणी (ता. परांडा, जि. धाराशिव) ग्रामपंचायतच्या सरपंच राणी शिंदे, उपसरपंच विनोद शिंदे व सदस्य प्रियंका माळी 2021 मध्ये निवडून आले होते. त्यांचे राजकीय विरोधक विठ्ठल शिंदे यांनी संबंधितांवर आक्षेप घेतला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Girish Mahajan and High Court
NCP Sharadchandra Pawar News : शरद पवारांचा मराठवाड्यात झंझावात; बीडमध्ये तीन तर संभाजीनगरात एक सभा घेणार..

खोटा ठराव घेऊन संबंधित तिघांनी पदाचा गैरवापर केल्याचे म्हटले होते. त्यांची तक्रार विभागीय आयुक्तांनी फेटाळली होती. याविरोधात ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे आपिल केले होते. आपिलात महाजन यांनी तिघांना अपात्र घोषित करण्याचे आदेश पारीत केले.

या आदेशाला ॲड. श्रीकांत कवडे यांच्यामार्फत खंडपीठात आव्हान देण्यात आले होते. ग्रामविकास मंत्री महाजन यांचे आदेश याचिकाकर्त्यांवर अन्याय करणारे असल्याचा युक्तीवाद ॲड. कवडे यांनी केला होता.

Girish Mahajan and High Court
PM Modi and Uddhav Thackeray : मोदींपाठोपाठ परभणीत उद्धव ठाकरेंचीही तोफ प्रचार सभेतून धडाडणार!

ग्रामपंचायत अधिनियमाचा भंग कुठेच झाला नसल्याचे खंडपीठाच्या ॲड. श्रीकांत कवडे यांनी निदर्शनास आणून दिले. संबंधित युक्तिवाद ग्राह्य धरत खंडपीठाने ग्रामविकास मंत्री महाजन यांचा अपात्रतेचा आदेश रद्दबातल ठरविला. खंडपीठाच्या निकालामुळे सरपंच, उपसरपंच व ग्रा. पं. सदस्य यांना पद बहाल झाले आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com