Hingoli APMC News : नेत्यांच्या सोयीच्या राजकारणाचा डाव कार्यकर्त्यांनी हाणून पाडला..

Market Committee : घुगे हे व्यापाऱ्यांच्या हितासाठी नेहमीच पुढाकार घेत असल्याने त्यांना दोन आमदारांचा विरोध होता.
Hingoli APMC News
Hingoli APMC News Sarkarnama

Marathwada : जिल्ह्यात हिंगोली, सेनगाव, कळमनुरी व जवळा बाजार या चार बाजार समीतीच्या निवडणूका झाल्या. यामध्ये हिंगोली बाजार समितीच्या (Hingoli APMC News) निवडणुकीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. या निवडणुकीत ठाकरे गट, शिंदे गट, भाजप आणि काँग्रेस यांनी स्थानिक महायुती केली होती. या महायुतीला दहा जागा मिळाल्या तर राष्ट्रवादी कॉंग्रेसने स्वतंत्र निवडणूक लढवत सहा जागांवर यश मिळविले. व्यापारी मतदार संघात माजी आमदार गजानन घुगे यांना भाजपने नाकारले होते. त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करून विजय खेचून आणला. एमआयएमनेही एका जागेवर विजय मिळवला.

Hingoli APMC News
Parbhani District APMC : बेबनाव, तरी नेत्यांनी आपापले गड राखत आघाडीला ताकद दिली..

इथे नेते विरुद्ध कार्यकर्ते अशी लढत झाली. जवळा बाजार, कळमनुरीत (Mahavikas Aghadi) महाविकास आघाडीला यश मिळाले तर सेनगावात भाजप, काँग्रेस, व ठाकरे गटाने एकत्रित येत केलेल्या आप्पास्वामी पँनलला यश मिळाले. (Bjp) येथे राष्ट्रवादी काँग्रेसला बाहेर ठेवण्यात आले होते. हिंगोली बाजार समितीच्या निवडणुकी दरम्यान विरोधक एकत्र आल्याने चांगलीच चर्चा रंगली होती. यामध्ये आर्थिक दुर्बल घटकातील दोन पैकी एक उमेदवार यापूर्वीच बिनविरोध निवडून आल्याने एकूण १७ जागांसाठी ही निवडणूक झाली.

प्रारंभी हिंगोली (Hingoli) बाजार समितीची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्व पक्षीय नेत्यांनी प्रयत्न केले. एरव्ही एकमेकांच्या विरोधात राहणारे विधानसभा स्तराचे नेते एकत्रित येऊ पाहत असल्याने नाराज झालेल्या कार्यकत्यांनी या निवडणुकीत 'बिनविरोध'च्या प्रयोग हाणून पाडला. सेनगावात देखील हाच पॅटर्न राबवला गेला. हिंगोलीत आमदार तान्हाजी मुटकुळे, माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर, शिवसेनेचे राजेश पाटील या नेत्यांनी एकत्र येऊन आपापले उमेदवार उभे केले.

नेत्यांच्या या पॅनलला राष्ट्रवादी सोबत काँग्रेस व शिवसेनेच्या नाराज कार्यकर्त्यांनी आव्हान दिले. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मनीष आखरे, काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद सदस्य श्यामराव जगताप यांच्या पॅनलतर्फे व्यापारी मतदार संघ वगळता सर्व जागांवर उमेदवार उभे केले होते. यामुळे नेते विरुद्ध कार्यकर्ते अशी लढत झाली. या निवडणुकीत शेतकरी विकास परिवर्तन पॅनलच्या सहा जागा निवडून आल्या. दुसया गटाकडे काठावर बहुमत आहे. त्यामुळे माजी आमदार गजानन घुगे, बुऱ्हाण पहिलवान हे काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे.

हिंगोली बाजार समीतीत व्यापारी मतदार संघाच्या निवडणुकीत जिल्ह्यासह राजकीय मंडळींचे लक्ष लागले होते. व्यापारी मतदार संघात यापूर्वी अनेकवेळा बिनविरोध निवडणुका घेण्यात आल्या होत्या. पूर्वी झालेल्या निवडणुकीत व्यापाऱ्यांच्या दोन जागा असलेल्या या गटात मतदान झाले होते. यंदाही तीन उमेदवार रिंगणात असल्यामुळे प्रत्यक्ष मतदान झाले. तीस वर्षापासून बाजार समितीचे सदस्य असलेले माजी आमदार घुगे व भाजपचे प्रशांत सोनी या दोघांसहित व्यापारी अशोक मुंदडा हे या निवडणुकीत उमेदवार होते.

Hingoli APMC News
Dharashiv District APMC: महाविकास आघाडीला मिळालेले यश, सत्ताधारी आमदारांसाठी धोक्याची घंटा ?

घुगे हे व्यापाऱ्यांच्या हितासाठी नेहमीच पुढाकार घेत असल्याने त्यांना दोन आमदारांचा विरोध होता. यामुळे त्यांनी अपक्ष उभे राहत विजय खेचून आणला. हमाल मापाडी मतदार संघात माजी संचालक वुहान पहिलवान यांना देखील विरोध होता. मात्र, तेदेखील निवडून आले. यानंतर आता सत्तांतराच्या हालचालींना वेग आला आहे. औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार येथील बाजार समितीच्या निवडणूकीत महाविकास आघाडी प्रणित शेतकरी विकास परिवर्तन पँनल व विद्यमान सभापती अंकुश आहेर यांच्या नेतृत्वाखाली बनविलेल्या शेतकरी विकास पॅनल यांच्यात लढत झाली.

येथे महाविकास आघाडीने १६ जागेवर विजय मिळवला तर आहेर यांच्या पॅनलला केवळ दोन जागेवर यश मिळाले. सेनगाव भाजप, काँग्रेस, ठाकरे गट यांच्या आप्पास्वामी पॅनलला १३, सरपंच संघटनेला दोन, तर तीन अपक्ष निवडून आले. येथे विद्यमान आमदार तानाजी मुटकुळे, माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर व शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांच्या आप्पास्वामी पॅनलला यश मिळाले. तर कळमनुरी बाजार समितीत महाविकास आघाडीला १२ जागेवर यश मिळाले.

Hingoli APMC News
Nilanga APMC Result News: निलंगेकरांकडून परफेक्ट नियोजन अन् करेक्ट कार्यक्रम..

येथे शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी, काँग्रेस, वंचित बहुजन आघाडीने एकत्र येत महाविकास आघाडी पुरस्कृत शेतकरी विकास पॅनल तयार केले होते. तर आमदार संतोष बांगर यांनी शिवसेना-भाजपा युतीचे जय भवानी शेतकरी विकास पॅनल. या पॅनलला पाच जागा मिळाल्या. सत्ता आणि सर्वाधिक चर्चेत आणि वादग्रस्त ठरलेल्या बांगर यांना आपल्याच मतदारसंघात अपयश आले.

दरम्यान, चारही बाजार समितीच्या निवडणूकीत एकमेकांसमोर एरव्ही विरोधात लढणारे एकत्र आले तर हिंगोली, सेनगावात नेते विरुध्द कार्येकर्ते अशी लढत पहायला मिळाली. चार बाजार समितीच्या निवडणूकीत हिंगोली बाजार समितीची निवडणूक चर्चेची ठरली. यामध्ये व्यापारी मतदार संघात माजी आमदार गजानन घुगे यांचा झालेला विजय हा चर्चेचा विषय ठरला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com