Hingoli Loksabha Constituency : प्रचाराला दोन दिवस उरले असताना पालकमंत्री सत्तार हिंगोलीत..

Loksabha Election 2024: एकीकडे मुख्यमंत्र्यांनी हिंगोलीची जागा प्रतिष्ठेची केलेली असताना त्यांच्याच पक्षाचे मंत्री आणि पालकमंत्री मात्र या सगळ्या प्रक्रियेपासून दूर होते.
Hingoli Loksabha Constituency
Hingoli Loksabha ConstituencySarkarnama
Published on
Updated on

Hingoli Loksabha News : महायुतीचे लोकसभेच्या हिंगोली मतदारसंघाचे उमेदवार बाबूराव कदम कोहळीकर यांच्या निवडणूक प्रचाराला दोन दिवस उरले असताना जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार सोमवारी (ता.22) मतदारसंघात हजर झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विद्यमान खासदार हेमंत पाटील यांची जाहीर झालेली उमेदवारी बदलून बाबूराव कदम यांना मैदानात उतरवले.

त्यांचा उमेदवारी अर्ज भरायला एकनाथ शिंदे Eknath Shinde स्वतः हजर राहिले. त्यानंतर दुसऱ्यांदा हिंगोलीत येऊन त्यांनी कदम यांच्या प्रचारासाठी सभा घेतली. एकीकडे मुख्यमंत्र्यांनी हिंगोलीची जागा प्रतिष्ठेची केलेली असताना त्यांच्याच पक्षाचे मंत्री आणि पालकमंत्री मात्र या सगळ्या प्रक्रियेपासून दूर होते. अखेर निवडणूक प्रचार संपायला दोन दिवस शिल्लक असताना सोमवारी (ता.22) सत्तार यांनी हिंगोलीत येत महायुतीच्या नेत्यांची बैठक घेत विजयाचा दावा केला.

Hingoli Loksabha Constituency
Eknath Shinde News : मोदींच्या कौतुकात मुख्यमंत्र्यांना बाळासाहेब ठाकरेंचा विसर ? शिवसैनिकांमध्ये चर्चा !

विद्यमान खासदार हेमंत पाटील (Hemant Patil) यांच्याशी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत वाद, आरोप-प्रत्यारोप आणि एकमेकांना आव्हान दिल्यापासून सत्तार यांचे हिंगोलीकडे दुर्लक्ष झाल्याचे बोलले जाते. शिवसंवाद मेळाव्याच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सत्तार-हेमंत पाटील एकाच व्यासपीठावर आले होते. पण दोघांनीही ऐकमेकांकडे ढुंकून पाहिले नव्हते.

आता ऐन लोकसभा निवडणुकीत पालकमंत्री सत्तार हिंगोलीत फिरकत नसल्याने स्थानिक नेते, पदाधिकारी आणि शिवसैनिकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू होत्या. या पार्श्वभूमीवर आज सत्तार हिंगोलीत आले आणि त्यांनी महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना चार्ज करण्याचा प्रयत्न केला. हिंगोली लोकसभा मतदारसंघासाठी 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे, तर 24 रोजी सायंकाळी निवडणूक प्रचार बंद होईल.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

त्यामुळे प्रचाराला दोन दिवस उरले असताना सत्तार हिंगोलीत दाखल झाल्याने अंतिम टप्प्यात वेगवान घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, हिंगोलीचे पालकमंत्री अब्दुल सत्तार, जालन्यात अतुल सावे, लातूर, नांदेडचे गिरीश महाजन, परभणीचे संजय बनसोडे, धाराशिवचे तानाजी सावंत लोकसभा निवडणुकीपासून अंतर राखून असल्याची चर्चा मराठवाड्यात सुरू होती.

लातूर, नांदेडच्या बाबतीत गिरीश महाजन Girish Mahajan यांची अशीच उदासीनता दिसून आली आहे. परभणीत बनसोडे, जालन्यात अतुल सावे तर धाराशिवमध्ये तानाजी सावंत हे पालकमंत्री लोकसभा निवडणुकीत फारसे सक्रिय नसल्याने महायुतीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. पैकी सत्तार उशिरा का होईना हिंगोलीत आल्याने बाबूराव कदम यांचा जीव भांड्यात पडला असेल. हिंगोलीमध्ये महायुतीचा थेट सामना महाविकास आघाडी ठाकरे गटाचे नागेश पाटील आष्टीकर यांच्याशी आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

R

Hingoli Loksabha Constituency
Vishal Patil News : सांगलीत तिरंगी लढत; काँग्रेसच्या विशाल पाटलांची बंडखोरी भाजपच्या पथ्यावर ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com