Shivsena Convention : शिवसेना नाशिकमधून फुंकणार लोकसभेचे रणशिंग; 28 वर्षांपूर्वीची पुनरावृत्ती होणार

Sanjay Raut News : शिवसेनेने नवीन वर्षात नाशिकला 23 जानेवारीला होणाऱ्या राज्यस्तरीय अधिवेशनाची तयारी सुरू केली.
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama

Nashik News : अठ्ठावीस वर्षांपूर्वी दार उघड बये दार उघड, अशी महाराष्ट्राच्या जनतेला हाक देत प्रथमच सत्ता मिळविणाऱ्या शिवसेनेने यंदा त्याची पुनरावृत्ती करण्याचा चंग बांधला आहे. पुन्हा तसेच आवाहन आणि हाक महाराष्ट्राच्या जनतेला देण्यासाठी त्यांनी पुन्हा एकदा नाशिकची निवड केली आहे. (State level convention of Shiv Sena on January 23 in Nashik)

येत्या 23 जानेवारीला शिवसेनेचे राज्यस्तरीय अधिवेशन नाशिकमध्ये होत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या अधिवेशनातून शिवसेना लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार आहे. त्यामुळे दुसऱ्यांदा नाशिकला अधिवेशन होणार असल्याने हे अधिवेशन शिवसेनेला निवडणूक जिंकून देणार का? याची चर्चा आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Uddhav Thackeray
Kalaben Delkar Meet Modi : ठाकरेंना मोठा धक्का; ज्यांच्यासाठी भाजपबरोबर पंगा घेतला तेच खासदार पक्ष सोडणार?

या अधिवेशनाच्या तयारीसाठी शिवसेनेचे शिष्टमंडळ आज सातपूर येथील जागेची पाहणी करण्यासाठी आले आहे. त्यापूर्वी शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पंचवटी येथील आरपी विद्यालयाच्या मैदानावर शिवसेनेचे 1995 मध्ये अधिवेशन झाले. यंदा हे अधिवेशन सातपूरला, तर जाहीर सभा गोल्फ क्लब मैदानावर होणार आहे. त्या अधिवेशनाने मराठमोळ्या तसेच भगवतीचे जागरगीत ‘दार उघड बये दार उघड’ या गोंधळ गीताने शिवसेना व भाजपला राज्यातील सत्तेची दारे उघडी केली होती. विधानसभेवर भगवा फडकणारच, ही घोषणा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यावेळी दिली होती.

Uddhav Thackeray
Maratha Reservation : ‘मी कोणत्याही परिस्थितीत मॅनेज होत नाही, हीच सरकारची मोठी अडचण’

सध्या नवीन व प्रागतीक विचारसरणींसह हिंदुत्वाच्या मार्गाने शिवसेना जात आहे. भाजपने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून पक्षात फूट पाडल्यानंतर ते निवडणुकीला सामोरे जात आहे. सध्या या पक्षाकडे कोणतीही सत्ता नाही. मात्र, लोकांची मोठी सहानुभूती शिवसेनेसोबत आहे. अशा संक्रमण अवस्थेतून जाणाऱ्या शिवसेनेसाठी जानेवारी महिना महत्त्वाचा आहे.

राज्यस्तरीय अधिवेशनाची तयारी होत असतानाच शिवसेनेच्या ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांचे मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता याच्याशी संबंध असल्याचे आरोप करण्यात आले. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात एसआयटी चौकशीदेखील लावली आहे. त्याअनुषंगानेही या अधिवेशनाला महत्त्व आहे.

Edited By : Vijay Dudhale

Uddhav Thackeray
Maratha Reservation : मुंबईत 20 जानेवारीपासून बेमुदत उपोषण; मनोज जरांगेंनी पुन्हा रणशिंंग फुंकले

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com