Marathwada : राज्याच्या राजकारणात एकमेकांविरुद्ध लढत असलेले ठाकरे-शिंदे गट, भाजप, काॅंग्रेस यांनी बाजार समितीसाठी (Market Committee) मात्र हात मिळवणी केली आहे. या चारही पक्षांनी राष्ट्रवादीला खड्यासारखे बाहेर ठेवत एकच पॅनल उभे केले. ही बाजार समिती बिनविरोध आणण्याचा सगळ्याच राजकीय पक्षाच्या स्थानिक नेत्यांचा प्रयत्न होता. मात्र राष्ट्रवादीला योग्य जागा मिळत नसल्याने त्यांनी वेगळी भूमिका घेतली.
काही अपक्ष आणि इतर पक्षांमधील नाराजांना सोबत घेत (Ncp)राष्ट्रवादीने या चार पक्षांच्या पॅनल विरोधात शेतकरी विकास पॅनल मैदानात उतरवले आहे. (Congress) काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजप-शिंदे गटासोबत युती करू नका, असे आदेश दिले होते. मात्र ते स्थानिक काॅंग्रेस नेत्यांनी धुडकावून लावले आहे.
दुसरीकडे राज्यात एकमेकांवर तुटून पडलेले शिंदेची (Hingoli) शिवसेना व ठाकरे गट या दोघांनीही बाजार समितीत जळवून घेतले. भाजपने देखील एकत्र पॅनल देण्याची भूमिका स्वीकारली. त्यामुळे हिंगोली बाजार समितीतमध्ये आता राष्ट्रवादी विरुद्ध इतर सगळे पक्ष असे चित्र निर्माण झाले आहे.
हिंगोली बाजार समितीसाठी १२६ अर्ज वैध ठरले होते, आज शेवटच्या दिवशी ७९ जणांनी माघार घेतली. १८ जागांसाठी आता ४७ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. ग्रामपंचायतीच्या आर्थिक दुर्बल घटक मतदारसंघातून गजानन आनंदा घ्यार हे बिनविरोध निवडून आले आहेत. उर्वरित जागांसाठी आता मतदान होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.