Police Officer Death : दोन महिन्यांपूर्वीच हिंगोलीत बदली; फौजदाराची धावत्या रेल्वेसमोर उडी, पोलिस दलात खळबळ

Hingoli police officer Amol Gangalwad dies in a railway incident; cause under investigation : अमोल गंगलवाड यांचा खटकाळी रेल्वे उड्डाणपुलाखाली मृत्यू; दोन महिन्यांपूर्वीच परभणीहून हिंगोलीत बदली, घटनेमागील कारणांचा तपास सुरू
Amol Gangalwad
Amol GangalwadSarkarnama
Published on
Updated on

Hingoli Police News : हिंगोली शहरात पोलिस दलाला हादरवून सोडणारी घटना घडली आहे. नियंत्रण कक्षात कार्यरत असलेल्या 50 वर्षीय फौजदार अमोल गंगलवाड यांचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाला.

खटकाळी रेल्वे उड्डाणपुलाखाली आज सकाळी साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे हिंगोली पोलिस दलात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमोल गंगलवाड हे सकाळी खटकाळी रेल्वे उड्डाणपुलाजवळ गेले होते. त्यावेळी ते काही तणावात असल्याचे सांगितले जात आहे. पूर्णाकडून अकोलाच्या दिशेने जाणारी रेल्वे (Railway) पुलाजवळ आली असताना ही दुर्दैवी घटना घडली.

घटनेची माहिती मिळताच रेल्वे स्टेशन मास्तरांनी हिंगोली पोलिसांना (Police) कळवले. माहिती मिळाल्यानंतर पोलिस अधीक्षक श्रेणिक लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस निरीक्षक देवेंद्रसिंह ठाकूर, सहायक निरीक्षक दिलीपकुमार मस्क, सहायक फौजदार संजय मार्के यांच्यासह पथकाने घटनास्थळी पाहणी केली.

Amol Gangalwad
Dheerajsinh Murder Case : कलबुर्मे अन् टिपरसेंकडून हिंदुत्ववादी कार्यकर्ते लक्ष; आमदार जगतापांच्या अहिल्यानगर पोलिसांवरील आरोपांनी खळबळ

दोन महिन्यांपूर्वीच हिंगोलीत बदली

अमोल गंगलवाड यांची सुमारे दोन महिन्यांपूर्वी परभणी येथून हिंगोली जिल्हा पोलिस दलात बदली झाली होती. ते हिंगोलीच्या नियंत्रण कक्षात कार्यरत होते. त्यांच्या मृत्यूची माहिती मिळताच पोलिस दलातील सहकारी आणि अधिकाऱ्यांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Amol Gangalwad
Dheerajsinh Rajput Murder Case : धीरजसिंह हत्या प्रकरणात संग्राम जगतापांचा पोलिसांवर गंभीर आरोप; SITवर मंत्री विखे काय म्हणाले?

पोलिस अधीक्षक म्हणाले.....

गंगलवाड यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले, त्यामागे नेमके कोणते कारण होते किंवा ते कोणत्या तणावातून जात होते, याबाबत सध्या स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. या घटनेमागील कारणांचा तपास करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक श्रेणिक लोढा यांनी दिली.

घटनेमागचे कारण काय?

अमोल गंगलवाड यांनी अचानक जीवन संपवल्याने पोलिस दलात विविध प्रश्न उपस्थित झाले आहेत. दोन महिन्यांपूर्वीच हिंगोलीत रुजू झालेल्या गंगलवाड यांच्यावर कोणता ताण होता का, त्यांच्या वैयक्तिक किंवा सेवेशी संबंधित काही अडचणी होत्या का, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. दरम्यान, या प्रकरणाचा तपास सुरू असून अधिकृत तपासातूनच गंगलवाड यांच्या मृत्यूमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com