Hingoli : बांगरांना टक्कर देण्यासाठी शिवसेनेचे आता दोन जिल्हाप्रमुख..

विधानसभा निवडणुकीला सव्वा दोन वर्षांचा कालावधी असला तरी बांगरांना धडा शिकवण्याची तयारी शिवसेनेने आतापासूनच सुरू केल्याचे दिसते. (Hingoli Shivsena)
Hingoli Shivsena News
Hingoli Shivsena NewsSarkarnama

हिंगोली : हिंगोलीचे जिल्हाप्रमुख तथा आमदार संतोष बांगर यांनी शिवसेनेशी बंडखोरी करत ऐनवेळी एकनाथ शिंदे यांच्या बंडाला साथ दिली. शिंदेंचे बंड यशस्वी होऊन राज्यात सत्तांतर झाले, ठाकरेंना पायउतार व्हावे लागले. (Hingoli) याची सल प्रत्येक शिवसैनिकांच्या मनात आहे. कुठल्याही परिस्थितीत एकही गद्दार पुन्हा निवडून येणार नाही, यासाठी (Shivsena) शिवसेनेने मोर्चे बांधणी सुरू केली आहे.

शिवसेनेच्या संघटन बांधणीत दोन जिल्हाप्रमुख नेमण्याची पहिल्यापासूनच प्रथा आहे. पण हिंगोली जिल्हा याला अपवाद होता. यापुर्वी (Santosh Bangar) संतोष बांगर हेच एकमेव जिल्हाप्रमुख म्हणून कार्यरत होते. पण बांगर यांच्या बंडानंतर शिवसेनेने जिल्ह्यात नव्याने संघटना बांधणी सुरू केली आहे. त्यानूसार शिवसेनेने आज हिंगोली जिल्ह्यासाठी दोन जिल्हाप्रमुखांच्या नावांची घोषणा केली. विनायक भिसे आणि संदेश देशमुख या दोन नव्या शिलेदांवर जिल्ह्याची धुरा सोपवण्यात आली आहे.

हिंगोली, कळमनुरी विधानसभेची जबाबदारी भिसे यांच्याकडे तर सेनगांव वसमतची संदेश देशमुख यांच्यावर सोपवण्यात आली आहे. कधीकाळी बांगर यांच्या नेतृत्वाखील जिल्ह्यात काम करणारे हे दोघेही बांगर यांच्या विरोधात काम करून शिवसेना जिल्ह्यात आणखी भक्कम कशी होईल यासाठी काम करणार आहेत. आमदार बांगर हे एकनाथ शिंदे यांच्या बंडात उशीराने सहभागी झाले होते.

सत्तातंरानंतर जेव्हा सभागृहात विधानसभा अध्यक्षांची निवड झाली, तेव्हा बांगर उद्धव ठाकरेंसोबत होते. पण रात्रीतून त्यांनी निर्णय बदला आणि विश्वासदर्शक ठरावाच्या दिवशी शिंदेंना पाठिंबा देत त्यांच्या गटात सहभागी झाले. शिवसेनेसाठी हा मोठा धक्का होता. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत बांगर यांना धडा शिकवायचाच, असा चंग उद्धव ठाकरे यांनी बांधला आहे.

Hingoli Shivsena News
Aimim : आम्हाला युतीच्या कुबड्यांची गरज नाही ; हिमंत असेल तर एकटे समोर या..

हिंगोलीच्या पदाधिकाऱ्यांशी उद्धव ठाकरे यांनी तेव्हा संवाद साधत खचू नका, मी तुमच्या सोबत आहे, आपण नव्याने पक्ष उभारू असा विश्वास शिवसनेच्या पदाधिकाऱ्यांना दिला होता. त्यानंतर दोन महिन्यातच ठाकरेंनी संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीने काही महत्वाचे निर्णय घेतले. त्यापैकीच एक म्हणजे दोन जिल्हाप्रमुखांची नेमणूक.

कालच काॅंग्रेसचे माजी आमदार संतोष टारफे आणि इतरांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर आज लगेचच जिल्हाप्रमुखांची घोषणा झाल्यामुळे जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. विधानसभा निवडणुकीला सव्वा दोन वर्षांचा कालावधी असला तरी बांगरांना धडा शिकवण्याची तयारी शिवसेनेने आतापासूनच सुरू केल्याचे दिसते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com