BRS Rally News : जिल्हा परिषद निवडणुकीत बीआरएसचा झेंडा फडकवा, दिल्लीतले नेते तुमच्या मागे धावत येतील..

K.Chandrashekhar Rao : महाराष्ट्रात धन की कमी नही, मन की कमी है, असा टोला राव यांनी लगावला.
K. Chandrasekhar Rao Rally News
K. Chandrasekhar Rao Rally NewsSarkarnama
Published on
Updated on

Marathwada : तुमच्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanivs) मला म्हणाले, तुम्ही तेलंगणा सांभाळा महाराष्ट्रात कशाला येता? मी त्यांना म्हणालो, तेंलगणा माॅडेल जसेच्या तसे महाराष्ट्रात राबवा मी मध्यप्रदेशात निघून जातो, अशा शब्दात तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी राज्य सरकारला आव्हान दिले. येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणूकीत सगळीकडे बीआरएसचा गुलाबी झेंडा फडकवा, मग बघा कसे दिल्लीपासून राज्यातील मोठे नेते तुमच्या मागे धावत येतील, असे आवाहन देखील त्यांनी उपस्थितांना केले.

K. Chandrasekhar Rao Rally News
Police Commissioner Transfer News : निखील गुप्ता यांची बदली, लोहिया नवे पोलिस आयुक्त..

केसीआर यांची आज शहरातील जांबिदा मैदानावर जाहीर सभा झाली. या सभेत शेकडो जणांनी बीआरएस पक्षात प्रवेश केला. आपल्या शांत आणि संयमी भाषेत राव यांनी अर्धा तास भाषण केले. (Aurangabad) यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या शेतकरी, पाणी आणि खाजगीकरणाच्या धोरणावर टीका केली. (K.Chandrashekhar Rao) चंद्रशेखर राव म्हणाले, तेलंगणा राज्याच्या निर्मिती आधी आमची दुरावस्था होती. वीज, पाणी, शेतकरी आत्महत्या अशा समस्या आम्हालाही भेडसावत होत्या. पण सत्तेवर येताच आम्ही हे चित्र पुर्णपणे बदलले.

राजकीय इच्छा शक्ती असेल तर हे शक्य होतेच. शेतकऱ्यांना प्रति एकर वर्षाला दहा हजार, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबाला आठवडाभरात घरपोच पाच लाखांची मदत, शेतात पिकलेले धान्य हमी भावाने खरेदी आणि त्याचे पैसे थेट बॅंक खात्यात, २४ तास मोफत वीज, प्रत्येक शेतात पाणी या गोष्टी आम्ही करून दाखवल्या. (Marathwada) तेलंगणापेक्षा मोठे राज्य असलेल्या महाराष्ट्रात हे का शक्य नाही? तुमच्या शहरात आठ दिवसाला पाणी येते हे दुर्दैवी आहे. ही परिस्थिती बदलण्याची गरज आहे, परिवर्तन करावे लागेल तरच हे चित्र बदलेल.

शेतकऱ्यांच्या आत्महत्या का होतायेत? याचा विचार का करत नाही? आम्ही परिवर्तनासाठी आलो आहोत, बीआरएस पक्षाचा जन्मच परिवर्तनासाठी झाला आहे. आमचे सरकार महाराष्ट्रात आणा तेलंगणा माॅडल राबवून शेतकऱ्यांचे जीवन सुसह्य बनवून दाखवतो, असा दावा राव यांनी केला. आपला भारत देश उदिष्टापांसून भरकटला आहे? बेरोजगारी वाढली आहे, उद्योग बंद पडतायेत, जातीयवाद, धार्मिक तेढ निर्माण केला जातोय. श्रीमंत अधिक श्रीमंत अन् गरीब अजून गरीब होत आहे.

देशात लोकशाही आहे का? असा प्रश्न पडतो, जर असेल तर शेतकऱ्यांना १३ महिने दिल्लीत आंदोलन का करावे लागले. साडेसातशे शेतकरी का मेले? असा सवाल करतांनाच परिवर्तन गरजेचे आहे. अनेक पक्षांना तुम्ही निवडून दिले, ते मोठे झाले, समस्या जशाच्या तशा आहेत. इकडे आमचा वाघ असलेला शेतकरी मरतोय, पंतप्रधान दक्षिण अफ्रिकेतील चित्ते आम्हाला दाखवत आहेत, असा टोला देखील राव यांनी लागवला. चीन, दक्षिण कोरिया, जपान सारखे देश आमच्या पुढे निघून गेले. मलेशिया, सिंगापूरची अवस्था आपल्यापेक्षा चांगली आहे.

K. Chandrasekhar Rao Rally News
BRS Rally News : ज्यांचे हैदराबादेत गुलाबी रुमाल देवून स्वागत, त्यांचेच आजच्या सभेत प्रवेश..

फक्त पंतप्रधान नेहरुंच्या काळात देशात प्रगती झाली, त्यानंतर आलेली सगळी सरकारे नालायक निघाली, असा घणाघात देखील केसीआर यांनी केला. पाण्याचे धोरणं बदलावे लागेल, असे सांगतानाच महाराष्ट्रात आमचे सरकार आणा, पाच वर्षात तुमच्या प्रत्येक घरात पाणी देतो, प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात पाणी देतो, असे आश्वासन देखील राव यांनी दिले. वीजेचा प्रश्न सुटू शकतो, पण त्यासाठी राजकीय इच्छा शक्ती हवी. आम्ही ते करून दाखवले आहे, आमच्या राज्यात इतका कोळसा आहे, की देशाला दीडशे वर्ष चोवीस तास विज दिली जाऊ शकते. हे खोटे असेल तर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देईन.

आमचे सरकार आले तर खाजगी कंपन्यांना विकलेले सगळे प्रकल्प परत घेतले जातील. डिजीटल इंडियाचे काय झाले? आमच्या राज्यात तलाठी नाहीत, तरी १५ मिनिटात शेतीच्या नोंदी व इतर कामे केली जातात. महाराष्ट्रात धन की कमी नही, मन की कमी है, असा टोला राव यांनी लगावला. जिल्हा परिषदेत गुलाबी झेंडा फडकवा, दिल्लीपासून नेते तुमच्या मागे धावत येतील, असे आवाहन करतानांच दलित बंधू योजना महाराष्ट्रात राबवा, फडणवीस साहेब आम्ही दुसऱ्या राज्यात निघून जावू असेही राव म्हणाले. नव्या संसद भवनाला आंबेडकरांचे नाव द्या, अशी मागणी देखील त्यांनी सभेत केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com