Police Commissioner Transfer News : निखील गुप्ता यांची बदली, लोहिया नवे पोलिस आयुक्त..

Shivsena : विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी तर जाहीर पत्रकार परिषद घेत आयुक्तांवर गंभीर आरोप केले होते.
Police Commissioner Transfer News
Police Commissioner Transfer News Sarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar : पोलिस आयुक्त निखील गुप्ता (Nikhil Gupta) यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी छत्रपती संभाजीनगरच्या पोलिस आयुक्त पदी पिंपरी चिंचवडचे सहआयुक्त असलेले मनोज लोहिया हे नवे पोलिस आयुक्त असतील. या संदर्भातील आदेश आज गृहविभागाने काढले आहेत.

Police Commissioner Transfer News
Karnataka Election : अबब! कर्नाटकात तब्बल २५६ कोटींची रोकड जप्त; 'या' बड्या नेत्यांच्या वाहनांची तपासणी

पोलिस आयुक्त डाॅ. निखील गुप्ता यांच्यावर शहरात नुकत्याच झालेल्या किराडपुरा भागातील दंगल प्रकरणी निष्काळजीपणा केल्याचा आरोप (Imtiaz Jalil) खासदार इम्तियाज जलील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला होता. (Aurangabad) किराडपुरा येथील दंगल चिघळण्यास पोलिस प्रशासन आणि आयुक्त गुप्ता हेच जबाबदार असल्याचे या दोन्ही नेत्यांनी जाहीरपणे म्हटले होते.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी तर जाहीर पत्रकार परिषद घेत आयुक्तांवर गंभीर आरोप केले होते. (Shivsena) एवढेच नाही तर आयुक्तांच्या आशिर्वादानेच शहरात हप्तेखोरी, अवैध धंदे सुरू असल्याचा आरोप करत पोलिसांकडून केल्या जाणाऱ्या वसुलीची आकडेवारीच जाहीर केली होती.

या संदर्भात त्यांनी राज्याच्या पोलिस महासंचालकाला पत्र पाठवत तक्रार देखील केली होती. तसेच या प्रकरणी कारवाई झाली नाही, तर गृहमंत्र्यांकडे तक्रार करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर आज राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची यादी जाहीर करण्यात आली. त्यात पोलिस आयुक्त निखील गुप्ता यांच्या नावाचा देखील समावेश आहे. त्यांच्या जागी मनोज लोहिया यांना आयुक्त पदी नियुक्त करण्यात आले आहे.

निखील गुप्ता यांना मात्र अद्याप नियुक्ती देण्यात आलेली नाही. त्यांच्या बदलीचे स्वतंत्र आदेश काढण्यात येणार असल्याचे गृह विभागाने स्पष्ट केले आहे. निखील गुप्ता यांचा शहरातील शेवटचा काळ वादग्रस्त ठरला. त्यांच्या काळात कायदा व सुव्यवस्था बिघडल्याचा आरोप सातत्याने केला जात होता. किराडपुरा येथील दंगलीनंतर मात्र ते राजकारण्यांच्या निशाण्यावरच होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com