BRS Rally News : ज्यांचे हैदराबादेत गुलाबी रुमाल देवून स्वागत, त्यांचेच आजच्या सभेत प्रवेश..

Chhatrapati Sambhajinagar : एखाद्या प्रस्थापित पक्षाच्या मेळाव्याची जशी तयारी असते त्यापेक्षा अधिकची तयारी बीआरएसच्या नेत्यांनी केली आहे.
BRS Rally News,Chhatrapati Sambhajinagar
BRS Rally News,Chhatrapati SambhajinagarSarkarnama
Published on
Updated on

Marathwada : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची जाहीर सभा छत्रपती संभाजीनगर शहरात अवघ्या काही तासांत सुरू होत आहे. (BRS)भारत राष्ट्र समिती अर्थात बीआरएस या आपल्या राष्ट्रीय पक्षाचा विस्तार करण्यासाठी केसीआर यांनी मराठवाड्याची निवड केली आहे. गेल्या महिनाभरात मराठवाड्यातील अनेक राजकीय पक्षातील आजी-माजी आमदार, पदाधिकारी, शेतकरी संघटनेचे नेते, कार्यकर्त्यांचे प्रवेश हैदराबादेत सुरू होते.

BRS Rally News,Chhatrapati Sambhajinagar
Pankaja Munde Speech: व्यापारी देशाच्या पाठीचा कणा, त्यांना संरक्षण मिळाले पाहिजे..

केसीआर यांच्या निवासस्थानी या सगळ्या नेते, पदाधिकाऱ्यांना गुलाबी रुमाल गळ्यात घालून पक्षात प्राथमिक प्रवेश देण्यात आलेला आहे. (K.Chandrashekahr Rao) पैकी नांदेड आणि लोहा येथे काहीजणांचे प्रवेश जाहीर सभेतून करून घेण्यात आले आहेत. आता बीड, परभणी आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ज्या लोकांनी आधी (Maharashtra) हैदराबादेत जावून बीआरएसमध्ये प्रवेश केले, त्याच नेत्यांचा आजच्या जाहीर सभेतून पुन्हा प्रवेश होणार आहे.

यासाठीच जाहीर सभेचा घाट घालण्यात आला आहे. आजच्या सभेत जाहीर प्रवेश होणाऱ्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची एक दोनशे जणांची भलीमोठी यादी बीआरएसकडून जारी करण्यात आली आहे. (Marathwada) ज्यावर नजर टाकली तर ज्यांचा हैदराबादेत पक्षप्रवेश झाला आहे, तेच सगळे लोक पुन्हा आजच्या सभेत प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट होते. केसीआर यांच्या सभेची जय्यत तयारी गेल्या आठवड्यापासून तेलंगणातून आलेली त्यांची टीम करत होती.

शहरात ठिकठिकाणी केसीआर यांचे होर्डींग्ज, बॅनर, झेंडे आणि पताका लावण्यात आल्या आहेत. राज्यातील एखाद्या प्रस्थापित पक्षाच्या मेळाव्याची जशी तयारी असते त्यापेक्षा अधिकची तयारी बीआरएसच्या नेत्यांनी छत्रपती संभाजीनगरात येवून केली आहे. आता केसीआर यांच्या सभेला गर्दी किती जमते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. शिवाय केसीआर आपल्या भाषणातून कोणावर निशाणा साधतात हे ही पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com