
Assembly Session News : काश्मीरच्या पहलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला झाला तेव्हा केंद्रातील काही वरिष्ठ अधिकारी हनी ट्रॅपमध्ये अडकल्याचा प्रकार समोर आला होता. तसाच प्रकार महाराष्ट्रात समोर येत आहे. काही राजकीय नेते आणि प्रशासनातील वरिष्ठ स्तरावरील अधिकारी हना ट्रॅपच्या जाळ्यात अडकल्याची माहिती आहे. यामुळे गुप्त माहिती बाहेर जाऊन सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी भिती विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी व्यक्त केली.
सभागृहात अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी 293 अन्वये या विषयावर चर्चेचा प्रस्ताव मांडला. राज्यातील राजकीय नेते व काही वरिष्ठ स्तरावरील अधिकारी हनी ट्रॅप मध्ये अडकल्याची चर्चा आहे. पहलगाम हल्ल्याच्या वेळेस असे ट्रॅपिंग करणारे लोकं केंद्र सरकारने पकडले होते. अशा हनी ट्रॅपमुळे राज्याची प्रशासकीय स्तरावरील गुप्त माहिती व महत्त्वाच्या फाइल बाहेर गेल्याची माहिती आहे.
राज्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने अशा घटना योग्य नसून ब्लॅक मेलिंगच्या घटना सुद्धा समोर आल्या आहेत. सर्वात महत्वाचं शासकीय कामकाजात याचा दुरुपयोग केला जाऊ शकतो. (Assembly Session) तसेच या हनी ट्रॅपमुळे प्रशासकीय लाभ घेतले जाण्याची शक्यता असल्याकडे दानवे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. विधानसभेतही हनी ट्रॅपच्या मुद्यावरून आमदार भास्कर जाधव आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले.
बोगस विद्यार्थी लाटतायेत लाभ..
धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारच्या वतीने श्रीमंत राजे मल्हारराव होळकर विद्यार्थी विकास योजना राबवली जाते. सदरील योजना चांगली असून योजनेचा गैरवापर केला जात आहे. संभाजीनगर - जालना जिल्ह्यातील या योजनेत गैर व्यवहार झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. धनगर समाजातील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळण्या ऐवजी बोगस संस्था याचा वापर करत आहे. बोगस वस्तीगृह, बोगस संगणक, बोगस शाळा आणि बोगस विद्यार्थी या संस्थाचालकांनी कागदावर दाखविली आहे. याची राज्य सरकारने चौकशी करून संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी दानवे यांनी केली.
गुटखा विकणाऱ्यांवर मकोका लावा..
राज्यात मोठ्या प्रमाणावर गुटखा विक्री सुरू आहे. गुटख्याचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यावर कारवाई व्हायला हवी, पण ती केली जात नाही. छोट्या टपरी चालकावर कारवाई केली जाते. 1 जून 2025 रोजी इगतपुरी येथे गुटख्याचे दोन ट्रक पकडले गेले. ठाणे येथे सुद्धा मागील काही दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणावर गुटखा पकडला गेला होता. सदरील खात्यातील काही वरिष्ठ पदावरील अधिकारी यांचा या गुटखा विक्रीशी संबंध असल्याचा दावा अंबादास दानवे यांनी केला. गुटखा विक्रीतील गंभीर गुन्हेगारांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात यावी. पोलिस या गुन्हेगारांवर कारवाई न करता ड्रायव्हरवर कारवाई करतात. सहभागी पोलिस अधिकारी आणि पोलिस संरक्षण असणाऱ्या गुन्हेगारांवर कारवाई होणे गरजेचे आहे, असेही अंबादास दानवे म्हणाले.
महाराष्ट्रात हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि गुजरात राज्यात उत्पादित झालेल्या किती औषधांचे कंटेंन राज्यातील प्रयोगशाळांत तपासण्यात आले. या तपासणी अहवालात काय निष्पन्न झाले? भिवंडी परिसरात वेगवगळ्या झोपडपट्ट्यात औषधी पॅकेजिंग केले जाते. येथील किती व्यवसायिकांना व्यवसाय परवाना राज्य सरकारने दिला आहे. कमी कंटेन असणाऱ्या वैद्यकीय व्यवसायिकांना मदत करणाऱ्यांवर काय कारवाई करण्यात आली? याची विचारणाही दानवे यांनी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.