
Nashik news: गेल्या काही वर्षांपासून 'हनीट्रॅप'ची शिकार होऊन अनेक गोपनीय व संवेदनशील माहिती शत्रूराष्ट्राला पुरवल्याची धक्कादायक प्रकरणं समोर आली होती. तसेच महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरातील अनेक प्रशासकीय अधिकारी आणि राजकीय नेतेही वारंवार हनी ट्रॅपची (Honey Trap) शिकार होत असल्याचं उघडकीस येत आहे.
याचदरम्यान, आता राज्यातील आजी-माजी मंत्री यांच्यासह तब्बल 72 वरिष्ठ सरकारी अधिकारी हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकल्याचा खळबळजनक दावा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे एका राजकीय नेत्याकडून हा दावा करण्यात आल्यानं आगामी दिवसांत राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
सध्या नाशिक (Nashik) दौऱ्यावर असलेल्या एका राजकीय नेत्यानं माध्यमांशी संवाद साधताना हा धक्कादायक विधान केलं आहे. महत्त्वाची बाब म्हणजे महाराष्ट्र राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच या राजकीय नेत्याच्या केलेल्या धक्कादायक विधानामुळे राज्याच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडण्याची चिन्हे आहेत.
संबंधित राजकीय नेत्यानं केलेल्या दाव्यात नाशिकमधील एका वरिष्ठ सरकारी अधिकारीही हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकल्याची म्हटलं आहे. हे व्हिडीओ हनी ट्रॅपचा भाग आहेत की,वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांच्या आक्षेपार्ह बाबी आहेत, असंही या संदर्भात स्पष्ट नसल्याचंही राजकीय नेत्यानं याबाबत बोलताना सांगितलं आहे.
राजकीय पक्षाच्या नेत्यानं केलेल्या 'हनीट्रॅप'प्रकरणातील गौप्यस्फोटात मुंबई,नाशिकसह पुण्यातील अनेक वरिष्ठ पातळीवरील प्रशासकीय अधिकारी आणि नेतेमंडळी अडकल्याची खळबळजनक माहिती आहे.
नाशिक शहरातील एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये संबंधित प्रकार घडल्याची चर्चा आहे. याप्रकरणी नाशिकच्या मुंबई नाका पोलिस ठाण्यात एका महिलेनं तक्रार दाखल केली होती.
मात्र, या हनीट्रॅपच्या प्रकरणात वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांचेही व्हिडिओ असल्यानं कोणीही अधिकारी पुढे येण्यास धजावत नसल्यानं अद्यापही या प्रकरणामुळे राजकीय आरोप-प्रत्यारोपांनी राजकारण तापलेलं नसल्याचं दिसून येत आहे.
एकीकडे विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच दुसरीकडे राज्यात एकापाठोपाठ एक धक्कादायक घटनांनी सत्ताधारी पक्षातील नेतेमंडळीही अडचणीत आल्याचं पाहायला मिळत आहे.अशातच आता नाशिकमधून हनीट्रॅपबाबतचं विधान एका राजकीय नेत्यानं केल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडण्याची शक्यता आहे.
या आरोपांमुळे प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील व्हिडीओ बाहेर आले, तर अनेक बडे मासे अडचणीत येण्याची शक्यता आहे. याचकारणास्तव संबंधित हनी ट्रॅपचं प्रकरण दाबले जाण्याचा आरोप केला जात आहे. मात्र, या धक्कादायक विधानांनी नाशिकसह आता राज्याचं राजकारणात मोठी उलथापालथ होणार असल्याचीही चर्चा आहे. पण या प्रकरणातील सत्यता कधी समोर येते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.