Assembly Session : 1 कोटी 65 लाखांचं एक शौचालय, सगळ्यांचे डोक्यावर हात : उदय सामंतांना आठवला आर.आर. आबांच्या भाषणातील किस्सा

Uday Samant toilet issue, RR Patil Speech : सामंत म्हणाले, मला स्वर्गीय आर.आर पाटील साहेबांचं एक भाषण आठवलं. ते ज्यावेळी गृहमंत्री होते, त्यावेळी त्यांनी एका अभियंत्यावर रेड टाकली होती.

Uday Samant On RR Patil Speech
Uday Samant On RR Patil SpeechSarkarnama
Published on
Updated on

Uday Samant On RR Patil Speech : भाजपचे आमदार अमित भास्कर साटम यांनी आकांक्षी शौचालय योजनेसंदर्भात विधानसभेत पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी सूचना केली. त्यांनी सांगितले की, पाच ठिकाणी हे प्रकल्प सुरू असून, प्रत्येकी १ कोटी ६५ लाख रुपये इतका खर्च दाखवण्यात आला आहे. म्हणजेच एका शौचालयासाठी तब्बल १ कोटी ६५ लाख रुपये खर्च केला जात आहे. इतक्या मोठ्या खर्चात ही शौचालये नेमकी किती आधुनिक आहेत, असा सवाल आमदार साटम यांनी उपस्थित केला.

यावर मंत्री उदय सामंत यांनी उत्तर दिलं. ते म्हणाले पाच नव्हे तर सात ठिकाणी ही कामे सुरु आहेत. २०२३-२४ च्या जिल्हा नियोजनाच्या समीतीमधून १२ कोटीचा निधी यासाठी देण्यात आला आहे. उर्वरित निधी देण्याच्या सूचना तत्कालीन पालकमंत्र्यांनी केल्या आहेत. प्रती शौचालय १ कोटी ६५ लाख रुपये याप्रमाणे ही कामे सुरु आहेत हेही खरे आहे. परंतु त्यात काय शौचालय आधुनिक आहे हे मी देखील आजून तपासून बघितलं नाही असं सामंत म्हणाले.

ही शौचालये अनधिकृत आहेत असं जे साटम यांनी सांगितलं आहे, त्याची शंभर टक्के चौकशी केली जाईल. त्यांनी मागणी केल्याप्रमाणे तीस दिवसांत ही चौकशी केली जाईल. जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत सर्व कामाला स्थगिती दिली जाईल असं सामंत यांनी स्पष्ट केलं.


Uday Samant On RR Patil Speech
Raksha Khadse : उज्ज्वल निकमांची एन्ट्री रक्षा खडसेंचं मंत्रिपद खाणार? राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

त्यानंतर भाजप आमदार अतुल भातखळकर उठले ते म्हणाले, सर्वात पहिली गोष्ट म्हणजे दीड कोटी रुपयाचं एक शौचालय हा नेमका कुठला खर्च आहे? याच्या मागचे आर्थिक गणित काय आहे ? याची खरे तर चौकशी केली पाहिजे. चौकशी करणार का असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

शिवाय फूटपाथवर या शौचालयांचे बांधकाम होणार आहे. अपंगांच्या स्टॉलसाठी आमच्या सारखे लोकप्रतिनीधी फूटपाथवर परवानगी मागता, त्यावेळी फूटपाथवर कुठल्याही प्रकारचं बांधकाम करायला सर्वोच्च न्यायालयापासून बंदी घातली आहे. असं सांगितलं जातं. मग ही शौचालये फूटपाथवर कशी बांधली जात आहेत असा सवाल करत ही कामं तत्काळ स्थगित नाही तर रद्द करण्याची मागणी त्यांनी केली. त्यावर उदय सामंत म्हणाले, तीस दिवसांत आपण चौकशी करु व त्यातून जे काही निष्पन्न होईल त्यावर कार्यवाही करु असं सांगितलं.


Uday Samant On RR Patil Speech
BJP Politics : भाजपची रणनिती ठरली ! निवडणुकीआधी मुख्यमंत्री फडणवीस आख्खा महाराष्ट्र पिंजून काढणार

त्यानंतर या सगळ्यात उदय सामंत म्हणाले, मला स्वर्गीय आर.आर पाटील साहेबांचं एक भाषण आठवलं. आर आर पाटील साहेब ज्यावेळी गृहमंत्री होते, त्यावेळी त्यांनी एका अभियंत्याच्या घरी रेड टाकली होती. आणि त्या रेड टाकलेल्या अभियंत्याच्या टॉयलेटमध्ये सोन्याचं भांडं बसवलेलं होतं. इतकं मोठं आणि इतकं भारी भांडं बसवून हा कायम तिथेच बसणार होता का असं आर आर पाटील म्हणाले होते..... असा किस्सा सामंत यांनी सांगितला. तशा पद्धतीची ही शौचालये आहेत का याची माहिती आम्ही घेऊ असं सामंत यांनी मिश्किलपणे सांगितलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com