Sanjay Shirsat- Imtiaz Jaleel : इकडे फौजदारी दावा, तिकडे शिरसाटांच्या विरोधातील पुरावे घेऊन इम्तियाज जलील सीबीआयकडे!

As Sanjay Shirsat files a criminal case, AIMIM MP Imtiaz Jaleel approaches the CBI with supporting evidence : सरकारकडून माझ्या तक्रारीची आणि आरोपांची दखल घेतली जाईल, अशी अपेक्षा होती. परंतु काहीच हालचाली दिसत नसल्याने मी शिरसाट यांच्याविरोधातील सगळे पुरावे सीबीआयला देण्यासाठी आलो आहे.
Sanjay Shirsat -Imtiaz Jaleel News
Sanjay Shirsat -Imtiaz Jaleel NewsSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar News : सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट आणि एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यातील वादा आता कोर्टापर्यंत पोहचला आहे. इकडे बदनामी आणि चारित्र्य हनन केले म्हणून संजय शिरसाट यांनी वकीलामार्फत जिल्हा सत्र न्यायालयात इम्तियाज जलील यांच्याविरोधात फौजदारी दावा दाखल केला. तर आज इम्तियाज जलील हे संजय शिरसाट यांच्यावर बेकायदा मालमत्ता खरेदीच्या आरोपांचे पुरावे घेऊन थेट मुंबईत सीबीआयचे कार्यालय गाठले.

मुंबईत इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांना जेव्हा फौजदारी दाव्या संदर्भात कळाले, तेव्हा हे माझ्यासाठी चांगलेच झाले. मीच संजय शिरसाट यांच्याविरोधात कोर्टात जाणार होतो. आता माझे काम सोपे झाले आहे, सगळे पुरावे मी आता कोर्टातही सादर करेल, असे इम्तियाज यांनी म्हटले आहे. आपण केलेले आरोप हे बिनबुडाचे नाहीत, सगळ्या पुराव्यानिशी मी ते केले आहेत.

व्हिट्स हाॅटेल खरेदी, एमआयडीसीतील भूखंड आरक्षण हटवून एमआयडीसीचे सगळे नियम धाब्यावर बसवून खरेदी केला आहे. सरकारकडून माझ्या तक्रारीची आणि आरोपांची दखल घेतली जाईल, अशी अपेक्षा होती. परंतु काहीच हालचाली दिसत नसल्याने मी संजय शिरसाट यांच्याविरोधातील सगळे पुरावे सीबीआयला (CBI) देण्यासाठी आलो आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपालांचीही मी वेळ मागितली होती. परंतु अद्याप मला ती मिळालेली नाही.

Sanjay Shirsat -Imtiaz Jaleel News
Sanjay Shirsat- Imtiaz Jaleel : इम्तियाज जलील यांच्याविरोधात संजय शिरसाट यांच्याकडून फौजदारी दावा! 24 रोजी सुनावणी

मुख्यमंत्री जाहीर सभांमधून आमचे सरकार भ्रष्टाचाराच्याविरोधात काम करणारे असल्याचे सांगतात, पण माझे म्हणणे ऐकून घेण्यासाठी ते दोन मिनिटंही द्यायला तयार नाहीत, असेही इम्तियाज जलील म्हणाले. मी कुठल्याही परिस्थितीत माघार घेणार नाही. सीबीआय, ईडी, इनकम टॅक्स डिपार्टमेंटकडे सगळे पुरावे, कागदपत्रं देणार आहे. ते काय कारवाई करतात हे पाहणार आहे.

Sanjay Shirsat -Imtiaz Jaleel News
ED officer arrested : २० लाखांची लाच घेताना ‘ED’च्या उपसंचालकास 'CBI'ने कार्यालयातच रंगेहाथ पकडलं

या संस्थानीही दखल घेतली नाही, तर मी कोर्टात जाणार असल्याचे आधीच जाहीर केले आहे. संजय शिरसाट यांनी माझ्या विरोधात दावा दाखल केला असले तर माझे काम अधिक सोपे झाले, याचा पुनरुच्चारही इम्तियाज जलील यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com