Abhimanyu Pawar News : `कैसे हो अभिमन्यू`, अमित शहांकडून विचारपूस कशाचे संकेत ?

Bjp : अमित शहा यांच्याशी वाढत चाललेली सलगी त्यांना उद्याच्या भाजपा राजकारणात मोठी संधी उपलब्ध करून देईल का?
Mla Abhimanyu Pawar With Amit Saha News, Latur
Mla Abhimanyu Pawar With Amit Saha News, LaturSarkarnama
Published on
Updated on

Marathwada Politics : औशाचे आमदार अभिमन्यू पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सलगी सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. अमित शहा (Amit Saha) यांच्या तोंडून पवारांबद्दल आपुलकीचे शब्द बाहेर पडत असल्याने आगामी काळात पक्ष त्यांच्यावर विशेष जबाबदारी टाकणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. एका कार्यकर्त्याला देवेंद्र फडणवीस यांनी आमदार बनवले, आता खुद्द अमित शहा यांची नजर अभिमन्यू पवारांवर पडल्याने औसा आणि लातूर जिल्ह्यातील राजकीय चित्र वेगळे असेल अशी चर्चा सुरू झाली आहे.

Mla Abhimanyu Pawar With Amit Saha News, Latur
Dharashiv Loksabha News : महाविकास आघाडीमुळे धाराशीवमध्ये ओमराजेंचे पारडे जड..

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचे स्वीय सहायक म्हणून काम करण्याची संधी मिळालेल्या पवारांनी अल्पावधीतच त्यांचे मन जिंकले. स्वीय सहायक म्हणून काम करत असतांना त्यांना पक्षांतर्गत विरोध मोडून काढत औसा मतदारसंघातून उमेदवारी दिली. नेतृत्वाने टाकलेला विश्वास सार्थ ठरवत (Abhimanyu Pawar) पवारांनी विक्रमी मतांनी विजय देखील मिळवला. अर्थात या विजयात देवेंद्र फडणवीस यांचा मोठा वाटा होता.

आमदार झाल्यापासून अभिमन्यू पवार यांचा सातत्याने पक्षश्रेष्ठीसोबत संपर्क वाढू लागला. मागील काही दिवसापुर्वी दिल्लीत झालेल्या साखर कारखानदारांच्या बैठकीत पवारांना उपस्थित राहण्याची संधी मिळाली. त्यावेळी अमित शहा यांनी 'अभिमन्यू तुझे इधर देखके मुझे बहुत खुशी हो गई, तु अब नेता बन गया है, ये मेरे लिए बहोत खुशी की बात है`, अशा शब्दात त्यांचे कौतुक केले होते.

काल बिदर जिल्ह्यात बोरठा येथील कार्यक्रमातही अमित शहा यांचे स्वागत करायला पहिल्या क्रमांकावर आमदार पवार उभे होते. यावेळी अमित शहा यांनी बाकी कोणालाही न बोलता' कैसे हो अभिमन्यू' म्हणत त्यांची विचारपूस केली. एकंदरीत आमदार पवारांची अमित शहा यांच्याशी वाढत चाललेली सलगी त्यांना उद्याच्या भाजपा राजकारणात मोठी संधी उपलब्ध करून देईल का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे..

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com