Aurangabad : खैरे किती एकनिष्ठ आहेत ? हे मी पत्रकार परिषद घेवून सांगेन ; बोरनारेंचा इशारा..

मी गद्दारी केली किंवा विकासकामे केली नसतील तर येणाऱ्या २०२४ मध्ये मतदार मला पराभूत करतील. तेव्हा शिवसेनेच्या नेत्यांनी त्यांची काळजी करू नये. (Mla Ramesh Bornare)
Chandrakant Khaire-Mla Ramesh Bornare
Chandrakant Khaire-Mla Ramesh BornareSarkarnama
Published on
Updated on

औरंगाबाद : शिवसेनेशी मी गद्दारी केलेली नाही, बंडखोर म्हणून माझ्या विरोधात निदर्शने करणे, बॅनरला काळे फासणे असे प्रकार आणि नेत्यांकडून होत असलेले आरोप योग्य नाहीत. वैजापूरच्या मतदारांनी मला विकासकामांसाठी निवडून दिले आहे. तो साधायचा असेल तर पाऊल उचलावे लागेल हे लक्षात आल्यानंतर मी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला.

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांना मी वैयक्तिक बोलण्यासाठी केलेले फोन त्यांनी माध्यमांवर व्हायरल केला. मला गद्दार ठरवून आपण किती एकनिष्ठ आहोत हे ते सांगत आहेत. पण ते किती एकनिष्ठ आहेत हे मला चांगलेच माहीत आहे, त्यामुळे हा राजकीय पेच संपल्यानंतर जेव्हा मी औरंगाबादला परत येईल, तेव्हा त्यांच्या एकनिष्ठतेचे किस्से पत्रकार परिषद घेऊन जाहीरपणे सांगेन, असा इशारा वैजापूरचे बंडखोर आमदार प्रा. रमेश बोरनारे (Ramesh Bornare) यांनी दिला.

एका स्थानिक वृत्त वाहिनीला फोनवरुन दिलेल्या प्रतिक्रियेत बोरनारे या बंडात सहभागी होण्यामागे आपला हेतू काय होता हे सविस्तरपणे सांगितले. बोरनारे म्हणाले, जे माझ्या सोबत बसतात, माझे पाहुणे आहेत ते अविनाश गलांडे माझ्यावर पैसे घेतल्याचा आरोप करतात, वैयक्तिक कौटुंबिक गोष्टी जाहीरपणे सांगतात ही अत्यंत क्लेशदायक बाब आहे.

मी विधान परिषद, राज्यसभा निवडणुकीत दोन कोटी रुपये घेतल्याचा आरोप गलांडे यांनी केला, पण त्यांना हे चांगल माहित आहे, की मी २०१९ मध्ये विधानसभेची उमेदवारी भरली तेव्हा शपथपत्रात १८ कोटींची संपत्ती दाखवली आहे. मला पैशाची गरज नाही, शिवाय एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याच्या निर्णयाबद्दल देखील मी त्यांच्याशी मुंबईत आणि वैजापूरमध्येही चर्चा केली होती.

Chandrakant Khaire-Mla Ramesh Bornare
Aurangabad : पक्ष फुटताच शिवसेनेने औरंगाबादच्या नामांतरावर घेतली टोकाची भूमिका

पक्षाचे पदाधिकारी आणि नातेवाईक म्हणून मी प्रामाणिकपणे त्यांचा सल्ला मागितला, तेव्हा त्यांनी भविष्याचा विचार करता तुम्ही एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलं पाहिजे असे सांगितले. आज तेच मला बंडखोर, गद्दार ठरवत आहेत, याचे वाईट वाटते. मला गद्दार ठरवणाऱ्या शिवसेनेच्या औरंगाबादेतील नेत्यांनी मी संघटनेसाठी २५ वर्ष दिली हे देखील विसरू नये. त्यानंतर दिवंगत नेते आणि माझे गुरू वाणी साहेबांनी मला विधानसभेची उमदेवारी मिळवून दिली.

विधानसभेला शिवसेना-भाजप युती होती, त्यामुळे माझ्या विजयात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसोबतच भाजप, माझे गुरूबंधु, वारकरी, माझे समर्थक अशा सगळ्यांचाच वाटा आहे. गेल्या अडीच वर्षात मतदारसंघातील कामे करतांना काय अडचणी आल्या हे आम्ही सांगितले आहे. एकनाथ शिंदे यांनी साथ दिली नसती तर मतदारसंघात काहीच करता आले नसते. मी गद्दारी केली किंवा विकासकामे केली नसतील तर येणाऱ्या २०२४ मध्ये मतदार मला पराभूत करतील. तेव्हा शिवसेनेच्या नेत्यांनी त्यांची काळजी करू नये, असे आव्हान देखील बोरनारे यांनी यावेळी केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com