
मागील वर्षी जून महिन्यात एकनाथ शिंदे यांनी ४० आमदार आणि १३ खासदारांसह उध्दव ठाकरेंच्या नेतृत्वाला आव्हान देत बंडखोरी केली होती. परिणामी ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला अन् महाविकास आघाडी सरकारला सत्तेतून पायउतार व्हावे लागले.
यानंतर भाजपसोबत युती करत राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थापन केलं. मात्र,महाविकास आघाडीच्या नेतेमंडळींकडून शिंदे फडणवीस सरकार लवकरच कोसळणार असल्याची भाकितं करण्यात येतात.
तसेच एकीकडे गौतम अदानी आणि हिंडेनबर्ग अहवालावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीत वादाची ठिणगी पडल्याची चर्चा आहे. याचदरम्यान, महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या माजी मंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात(Balasaheb Thorat) यांनी मोठं विधान केलं आहे.
राज्यात पुन्हा एकदा महाविकास आघाडी सत्तेत येणार असल्याचा आत्मविश्वास व्यक्त केला आहे. यावेळी त्यांनी थेट लोकसभा आणि विधानसभेतील विजयी जागांचा आकडाही जाहीर केला आहे.
धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात प्रचारासाठी आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. थोरात म्हणाले, राज्यात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी(MVA)ला घवघवीत यश मिळेल. यात लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी ३८ जागा आणि विधानसभेच्या निवडणुकीत १८० जागांवर विजयी होईल असं थोरात यावेळी म्हणाले.
राज्यात बाजार समितीच्या निवडणुका लागल्या आहेत. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात प्रचारात आले होते. धुळे येथे प्रचारात अनेक नेते उतरले आहेत.
...म्हणून माझा आघाडीच्या सभेला विरोध!
छत्रपती संभाजीनगरमधील यशस्वी सभेनंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या होम ग्राऊंडवर अर्थात नागपूरमध्ये महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा होत आहे. ही सभा येत्या १६ एप्रिलला होणार आहे. मात्र, या सभेला भाजपने विरोध दर्शविला आहे. खेळाच्या मैदानावर महाविकास आघाडीची सभा होत असल्याने या मैदानात सभा होऊ नये यासाठी माझा विरोध आजही कायम आहे असं भाजप आमदार कृष्णा खोपडे म्हणाले आहेत.
आघाडीतील नेते वरिष्ठांची दिशाभूल करताहेत का?
तसेच त्या भागातील नागरिकांसोबत राष्ट्रवादी आणि ठाकरे सेनेचे लोकही म्हणतात हे मैदान लहान आणि खेळाचं मैदान आहे त्यामुळे सभा नको, असं भाजप आमदार कृष्णा खोपडे म्हणाले आहे. सातशे आठशे लोकांची कॅपॅसिटी असलेल्या या मैदानावर सभा घेण्यावर महाविकास आघाडी का आग्रही आहे जेव्हा की ही सभा लाखोच्या वर होणार असल्याचं सांगितलं जातं मग काँग्रेस आणि महाविकास आघाडीतील स्थानिक नेते वरिष्ठांची दिशाभूल करत आहे का? असंही खोपडे म्हणाले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.