Ahmadnagar Politics : बावनकुळेंचे शिर्डीमध्ये वेगळे संकेत? खासदार विखेंना गाडीवर घेत केले सारथ्य

Mp Sujay Vikhe : प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात भाजप कार्यकर्त्यांनी मोटारसायकल रॅली काढली होती.
Chandrasekhar Bawankule,  Sujay Vikhe News
Chandrasekhar Bawankule, Sujay Vikhe NewsSarkarnama

Chandrasekhar Bawankule News : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज (ता. 9) शिर्डी (Shirdi) दौऱ्यावर आहेत. त्यांच्या उपस्थितीत अहमदनगर जिल्ह्यातील पदाधिकारी बैठक पार पडली. तत्पूर्वी बावनकुळे यांच्या नेतृत्वात भाजप (BJP) कार्यकर्त्यांनी मोटारसायकल रॅली काढली होती. या रॅलीत बावनकुळे यांनी खासदार सुजय विखेंना डबलसीट घेत स्वतः मोटारसायकल चालवली, यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.

शिर्डीत ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करत कार्यकर्त्यांनी बावनकुळे यांचे जोरदार स्वागत केले. मात्र, मोटारसायक रॅलीमध्ये बावनकुळे यांच्या गाडीवर सुजय विखे पाटील (Sujay Vikhe) बसले होते, या घटनेने विशेष लक्ष वेधले. यामुळे भाजप प्रदेशाध्यक्षांनी काही संकेत दिलेत का? अशीही चर्चा सुरु झाली आहे. अहमदनगर जिल्ह्याचे भाजपचे राजकारण विखे यांच्या भौवतीच फिरणार असल्याचेही जाणकारांचे मत आहे.

Chandrasekhar Bawankule,  Sujay Vikhe News
Eknath Shinde Ayogya news: अयोध्या दौऱ्यावर टिका करणाऱ्या विरोधकांवर एकनाथ शिंदेंचा पलटवार; मी घरात बसून....

दरम्यान, यावेळी बावनकुळे म्हणाले, २०२४ मध्ये भाजप (BJP) आणि शिवसेनेचे काम बघून अनेकजण इकडे उड्या मारतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पाचे वाचन केले, त्या वेळी विरोधी आमदारांचे चेहरे लहान झाले होते. २०२४-२५ चा अर्थसंकल्प वाचतील तेंव्हा अनेक लोक भाजपमध्ये उड्या मारतील. मात्र, कुठले लोक उड्या मारतील हे आज सांगत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Chandrasekhar Bawankule,  Sujay Vikhe News
Bawankule on Thackeray : भाजप अन् ठाकरे भविष्यात एकत्र येतील का? बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं...

विश्वासघाताच्या राजकारणाला भाजपमध्ये थारा नाही. आम्ही व्यक्तीगत टिका करत नाही. मात्र, आपल्याकडून टिका टिप्पणी होत आहे. त्यामुळे आम्ही हात किंवा तोंड बांधलेले नाही, असा इशाराही त्यांनी विरोधकांना दिला. व्यक्तीगत टिका टिप्पणी तुमच्या ना आमच्यासाठी योग्य आहे, असा सल्लाही त्यांनी दिला. विश्वासघाताचे राजकारण उद्धव ठाकरेंकडून झाले असून भाजपला हे राजकारण पसंत नसल्याचेही ते म्हणाले. त्यामुळे भाजप आणि ठाकरे पुन्हा एकत्र येतील का? यावर शंका वाटते, असेही यावेळी बावनकुळे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com